AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saif Ali Khan : अखेर तो सापडला; आरोपीचा फोटो समोर, मध्यरात्री सैफ अली खानवर केला होता चाकू हल्ला

Saif Ali Khan Accused Photo : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर मध्यरात्री हल्ला झाला. चाकूने त्याच्यावर 6 वार करण्यात आले. त्यातील दोन वार हे अत्यंत खोलवर होते. जीवे मारण्याच्या हेतूने हल्ला झाल्याचे दिसून येते. त्या आरोपीचा आता पत्ताच नाही तर फोटो सुद्धा मिळाला आहे.

Saif Ali Khan : अखेर तो सापडला; आरोपीचा फोटो समोर, मध्यरात्री सैफ अली खानवर केला होता चाकू हल्ला
सैफ अली खान चाकू हल्लाप्रकरण आरोपी सापडला
| Updated on: Jan 16, 2025 | 5:34 PM
Share

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर मध्यरात्री हल्ला झाला. चाकूने त्याच्यावर 6 वार करण्यात आले. त्यातील दोन वार हे अत्यंत खोलवर होते. जीवे मारण्याच्या हेतूने हल्ला झाल्याचे दिसून येते. त्या आरोपीचा आता पत्ताच नाही तर फोटो सुद्धा मिळाला आहे. पोलिसांनी याविषयीचे सीसीटीव्हीतील फुटेजमधील आरोपीचा फोटो शेअर केला आहे.

पोलिसांच्या 15 टीमकडून तपास

सैफ अली खानवर मध्यरात्री हल्ला करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. विरोधकांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर बोट ठेवले होते. दरम्यान घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली. तपास करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेच्या 8 टीम स्थापना करण्यात आल्या. तर मुंबई पोलिसांच्या 7 टीम तयार करण्यात आल्या. सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी एकूण 15 टीमकडून तपास करण्यात येत आहे.

…आणि सीसीटीव्हीमध्ये तो सापडला

आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर येत आहे. त्याने सैफ अली खान याच्यावर हल्ला केल्यानंतर पायऱ्यांचा वापर केला. घरातून पळून जाताना सैफवर चाकू हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपास केला. त्यात आरोपी पायऱ्यावरून उतरताना 6 व्या मजल्यावर दिसला. या फोटोवर 2 वाजून 33 मिनिटांची वेळ दिसत आहे.

आरोपी पायऱ्यावरून उतरताना कैद

सराईत गुन्हेगार असण्याची शक्यता

पोलिस सूत्रांच्या माहिती प्रमाणे, ज्या व्यक्तीने सैफ अली खानच्या घरात चोरी करून हल्ला केला तो सराईत गुन्हेगार असू शकतो. ही घटना ज्या पद्धतीने घडली त्याची मोडस ऑपरेंडी पाहता हल्लेखोरावर यापूर्वीही असेच गुन्हे दाखल झाले असावेत. पोलिसांचा असा विश्वास आहे की, अशा प्रकारच्या घटना केवळ सराईत आरोपीच करू शकतात.

आरोपी प्रभादेवी परिसरात लपला

आरोपी प्रभादेवी परिसरात लपला. पोलिसांना लोकेशन सापडलं. पोलीस तपास घेत आहेत. हल्ल्याच्या वेळी डम डेटाच्या आधारे आरोपीची ओळख पटली, पोलिसांना त्या भागात कोणते मोबाइल नेटवर्क सक्रिय होते याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असल्याचे समजते.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी