खिचडी घोटाळ्याचे संजय राऊत सूत्रधार, एक कोटीची दलाली घेतली… संजय निरुपम यांचा दावा

| Updated on: Apr 08, 2024 | 12:36 PM

BMC khichdi scam sanjay nirupam on sanjay raut: शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत खिचडी घोटाळा प्रकरणाचे सूत्रधार आहेत. त्यांच्या कुटुंबियांना या प्रकरणात एक कोटीची दलाली घेतल्याचा सणसणाटी निर्माण करणारा आरोप संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेऊन केला.

खिचडी घोटाळ्याचे संजय राऊत सूत्रधार, एक कोटीची दलाली घेतली... संजय निरुपम यांचा दावा
sanjay nirupam
Follow us on

मुंबई मनपात झालेल्या खिचडी घोटाळा प्रकरणात नवीन ट्विस्ट आले आहे. या प्रकरणात ८ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. या घोटाळ्यावरून सोमय्या यांनी शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप केले होते. आता काँग्रेसमधून बाहेर पडलेले संजय निरुपम यांनीही संजय राऊत यांच्यावर या प्रकरणात आरोप केले आहेत. संजय राऊत खिचडी घोटाळा प्रकरणाचे सूत्रधार आहेत. त्यांच्या कुटुंबियांना या प्रकरणात एक कोटीची दलाली मिळाल्याचा सणसणाटी निर्माण करणारा आरोप संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेऊन केला.

काय म्हणाले संजय निरुपम

संजय निरुपम यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्यावर आरोप केले. खिचडी घोटाळ्यात संजय राऊत यांच्या कुटुंबाने एक कोटीची दलाली घेतली. संजय राऊत यांच्या भावाच्या, मुलीच्या नावाने चेकद्वारे रक्कम घेतले. संजय राऊत यांची मुलगी निकिता हिच्या खात्यात 3लाख 50 हजार, 5 लाख, तीन लाख अशी रक्कम जमा झाली. तसेच संदीप राऊत यांच्या खात्यात 5 लाख, 1 लाख 25 हजार रुपये जमा झाले. सुजीत पाटकर यांच्या खात्यात 14 लाख, 14 लाख, 10 लाख, 1 लाख 90 हजार, 1 लाख 90 हजार जमा झाल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह करत होते

जोगेश्वरीमध्ये एका रेस्टॉरंटने आपले स्वयंपाकघर असल्याचा दावा करून टेंडर काढले गेले. हॉटेल मालकालाही त्याची माहिती नव्हती. या कंपनीत कदम नावाची व्यक्ती नाही, मात्र टेंडर देण्यात आली होती. 6.5 कोटी रुपयांचे कंत्राट घेऊन दुसऱ्या कंपनीला दिले. त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह करायचे, मी गरिबांच्या पाठीशी म्हणत होते, असे संजय निरुपम यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

संजय राऊत यांना अटक करा

खिचडी प्रकरणाचा तपास ED करत आहे. या तपासात स्थानिक उमेदवारासोबतच संजय राऊत यांनाही अटक करण्यात यावी, अशी माझी मागणी आहे. ईडीकडून सुरु असलेल्या तपासाचा विस्तार व्हायला हवा. महाविकास आघाडीचा उमेदवारही खिचडी चोर असून ज्यांनी त्यांना उमेदवारी दिली तेही चोर आहेत, असे संजय निरुपम यांनी म्हटले आहे.