“संजय राऊत यांच्या सारख्या बकबक करणाऱ्यांची चौकशी करा”, संजय निरुपम यांची एनआयएकडे मागणी

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या मुद्यावरुन काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.

संजय राऊत यांच्या सारख्या बकबक करणाऱ्यांची चौकशी करा, संजय निरुपम यांची एनआयएकडे मागणी
संजय निरुपम संजय राऊत
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 10:45 AM

मुंबई: मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं असलेली स्कॉर्पिओ (Ambani Bomb Scare) आणि मनसुख हिरने मृत्यू (Mansukh Hiren Death Case )प्रकरण रोज नवनवीन गोष्टींमुळं चर्चेत असते. एनआयएच्या ताब्यात असलेल्या निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या मुद्यावरुन काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. संजय निरुपम यांनी सचिन वाझे आणि शिवसेना यांच्या संबंधावरुन टीका केली आहे. निरुपम यांनी यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत हे पहिल्यांदा सचिन वाझे प्रामाणिक अधिकारी असल्याचं म्हणत होते, आता ते वाझे यांच्या नियुक्तीच्या विरोधात असल्याचं सांगतात. एनआयएनं आता संजय राऊत यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी, अशी मागणी संजय निरुपम यांनी केली आहे. (Sanjay Nirupam demanded NIA will inquire Sanjay Raut for investigation of who reinstate vaze in service)

संजय निरुपम काय म्हणाले?

संजय निरुपम त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, “संजय राऊत यांनी सांगितले की ते सचिन वाझे यांना पोलिसांमध्ये परत घेण्याच्याविरोधात होते. पहिल्यांदा त्यांनी वाझे प्रामाणिक आणि सक्षम अधिकारी असल्याचं म्हटलं होतं. संजय राऊत यांनी वाझे कोणत्या नेत्यांच्या खांद्यावर बसून पोलीस दलात परत आले, राष्ट्रीय तपास यंत्रणेनं राऊत यांना उचलून चौकशी करुन त्यांच्यामागील सूत्रधारापर्यंत पोहोचावं, असं संजय निरुपम म्हणाले.

संजय निरुपम यांचं ट्विट

परमबीर सिंह यांच्या याचिकेवर आज सुनावणी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमीर सिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. परमबीर सिंह यांनी पहिल्यांदा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. तिथे त्यांची याचिका फेटाळली गेली आणि त्यांना हायकोर्टात जाण्यास सांगण्यात आले. आता त्यांच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. ही गोष्ट त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कळवत कारवाईची मागणी केली होती. राज्य सरकारनं या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली.

मनसुख हिरेन हत्याप्रकरणात 35 जणांचे जबाब

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मनसुख हिरेन हत्याप्रकरणात आणखी तीन जणांचे जबाब नोंदवले आहेत. आतापर्यंत याप्रकरणात एकूण 35 जणांनी जबाब नोंदवले आहेत. तसेच 100 कोटी रुपयांच्या वसुलीसंदर्भातही एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून काही पब, बार आणि हॉटेल मालकांचे जबाब नोंदवण्यात येणार असल्याचे समजते.

संबंधित बातम्या:

जिथे ज्याची ताकद त्याच्या नेतृत्वात लढायचं, आघाडीचं ठरलं; राऊतांनी सांगितला नवा फॉर्म्युला

मुंबईसह महाराष्ट्रासाठी पुढचे 15 दिवस महत्वाचे, रुग्ण वाढले तर लॉकडाऊन अटळ?

(Sanjay Nirupam demanded NIA will inquire Sanjay Raut for investigation of who reinstate vaze in service)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.