दिल्ली में मिल तुझे एके 47 से उडा देंगे… संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी, पंजाबच्या खतरनाक गँगस्टरच्या नावाने दिली धमकी

| Updated on: Apr 01, 2023 | 10:25 AM

खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पंजाबमधील खतरनाक गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

दिल्ली में मिल तुझे एके 47 से उडा देंगे... संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी, पंजाबच्या खतरनाक गँगस्टरच्या नावाने दिली धमकी
Follow us on

मुंबई : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पंजाबमधील खतरनाक गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. धमकी देणारा व्यक्ती पुण्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपास करत आहेत. दिल्ली में मिल तुझे एके 47 से उडा देंगे, अशी धमकी या मेसेजमधून देण्यात आली आहे. दरम्यान, या धमकीनंतर संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राऊत यांना काल रात्री 9 वाजता एक त्यांच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेज आला. त्यात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही धमकी आल्यानंतर संजय राऊत यांनी तात्काळ मुंबईचे पोलीस आयुक्त आणि विशेष आयुक्त यांना माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई केली. याबाबत संजय राऊत यांच्याशी टीव्ही9 मराठीने संपर्क साधला. त्यावर राऊत यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचं स्पष्ट केलं. तसेच मुंबई पोलिसांनी या प्रकरणी काही लोकांना ताब्यात घेतलं आहे. नेमके किती लोक आहेत, याची माहिती नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

सलमानचाही उल्लेख

या टेक्स्ट मेसेजमध्ये राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच त्यांना शिवीगाळही करण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई या पंजाबमधील खतरनाक गँगगस्टरच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. तसेच या मेसेजमध्ये सलमान खानच्या नावाचाही उल्लेख आहे.

मेसेजमध्ये काय आहे?

हिंदू विरोधी. मार दूँगा तुझे. दिल्ली में मिल तू एके 47 से उडा दूँगा. मुसेवाला टाईप. लॉरेन्स के और से मेसेज है. सोच ले XX सलमान और तू फिक्स, अशी धमकी या टेक्स्ट मेसेजमधून देण्यात आली आहे. या मेसेज नंतर पोलिसांनी तात्काळ संजय राूत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.