बाबर आक्रमक होता हे सिद्ध झालंय, बाबरी खटला बेकायदेशीर, अडवाणींना साक्षीला बोलावणे विसंगत : संजय राऊत

| Updated on: Jul 21, 2020 | 2:35 PM

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बाबरी खटला चालवण्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे (Sanjay Raut on Babri case Lal krishna Advani).

बाबर आक्रमक होता हे सिद्ध झालंय, बाबरी खटला बेकायदेशीर, अडवाणींना साक्षीला बोलावणे विसंगत : संजय राऊत
Follow us on

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बाबरी खटला चालवण्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे (Sanjay Raut on Babri case Lal krishna Advani). सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराचा निर्णय दिला आहे. त्यातून बाबर हा आक्रमक होता हे सिद्ध झालंय. त्यामुळे आता भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना साक्षीला बोलावणे विसंगत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी बाबरी खटला चावलणे बेकायदेशीर असल्याचाही दावा केला. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने होत आहे. याचा अर्थ बाबरीचं प्रकरण निकाली लागला आहे. बाबर आक्रमक होता हे सिद्ध झालं आहे. बाबराचं आक्रमण हे बेकायदेशीर होतं हेही सिद्ध झालं आहे. यानंतरही बाबरीचा जो नवीन खटला सुरु आहे तो बेकायदेशीर ठरतो.”

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!


“एका बाजूला आडवाणींना आपण सन्मानाने राम मंदिर भूमिपूजनाला सन्मानाने बोलावणार आहोत. दुसरीकडे त्यांच्यावर बाबरीचा खटला सुरु आहे. ही विसंगती आहे. आडवाणींची साक्ष ऑनलाईन होवो अथवा ऑफलाईन, मात्र, आता राम मंदिराचं भूमिपूजन होत असताना बाबरी विध्वंसाचा खटला चालवणं हे बेकायदेशीर आहे,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

“अलाहाबाद उच्च न्यायालयाचा एक आदेश आहे, त्यानुसार सीबीआय या प्रकरणाचा पुन्हा तपास सुरु केला आहे. मात्र, हे चुकीचं आहे. हा खटला रद्द करायला हवा. यावर सरकारने निर्णय घ्यायला हवा,” असंही संजय राऊत म्हणाले.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

संजय राऊत म्हणाले, “लालकृष्ण आडवाणी यांनी प्रमोज महाजनांनी सारथ्य केलेली रथयात्रा काढली होती. त्यामुळे या संपूर्ण आंदोलनाला गती मिळाली होती. संघर्ष पुढे गेला त्यात लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अशा अनेकांचा त्याग, बलिदान, घाम, रक्त या कामात आहे. अशोक सिंघल यांचं नावही यात विसरता येणार नाही.”

“या काळात राम मंदिराच्या भूमिपूजनामुळे अनेक रामभक्तांची निराशा”

“या काळात राम मंदिराच्या भूमिपूजनामुळे अनेक रामभक्तांची निराशा होणार आहे. कारण ते या क्षणाची मोठ्या काळापासून वाट पाहत होते. त्यांना तेथे जायचं होतं. मात्र, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. शारीरिक अंतर ठेवणं, लॉकडाऊन असे अनेक विषय आहेत,” असंही संजय राऊत म्हणाले.

संबंधित व्हिडीओ:


हेही वाचा :

राम मंदिराचं भूमिपूजन आवश्यक, उद्धव ठाकरे नक्कीच अयोध्येत जातील : संजय राऊत

शरद पवार राम मंदिराच्या भूमीपूजनावर ‘त्या’ अनुषंगाने बोलले, जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण

राम मंदिर उद्धव ठाकरेंच्या श्रद्धेचा विषय, कोरोना अपयश लपवण्यासाठी भाजपकडून पायाभरणीचा कार्यक्रम : थोरात

Sanjay Raut on Babri case Lal krishna Advani