Sanjay Raut: डोक्यात दगड टाकून… संजय राऊतांचा संताप अनावर… सचिन अहीर यांनी पक्ष बदलताच सणसणीत टोला
Sanjay Raut on Sachin Ahir: आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सहकारी सचिन अहिर यांनी उद्धव सेनेला जय महाराष्ट्र केला. हा सर्वांनाच अनपेक्षित धक्का होता. कालच खासदार संजय राऊत यांची तीव्र प्रतिक्रिया उमटली. आज त्यांनी पुन्हा अहिर यांच्यावर निशाणा साधला. त्यांचा राजकीय प्रवास कलंकित असल्याचा आरोप केला.

Sanjay Raut on Sachin Ahir: 6 खासदारांच्या फुटीनंतर उद्धव सेनेला काल अचानक मोठा धक्का बसला. आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सहकारी सचिन अहिर यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला. त्यावर ठाकरे सेनेतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आज खासदार संजय राऊत यांनी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सचिन अहिर यांच्यावर निशाणा साधला. सचिन अहिर यांची विधान परिषद सभागृहाचे उपसभापती म्हणून औपचारिक घोषणा बाकी आहे. त्याचवेळी राऊतांनी त्यांना आरसा दाखवला आहे. अहिर यांचा राजकीय प्रवास कलंकित असल्याचा आरोप त्यांनी केला.
पवारांना बेसावध ठेवून अहिर शिवसेनेत
शरद पवार यांना बेसावध ठेवून सचिन अहिर हे शिवसेनेत दाखल झाले होते. पुढील करिअरसाठी अहिरांनी शरद पवार यांना देखील सोडलं होतं. अचानक ते शरद पवार आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबाला बेसावध ठेवून ते शिवसेनेमध्ये आम्ही असं म्हणतो की शरद पवार झाले नाही त्याच्यामुळे ते आमचे कसे होतील? त्या काळात अहिरांना मंत्री करणं हे मोठं साहस होतं. सचिन अहिर यांचा राजकीय प्रवास कलंकित असल्याची जहरी टीका खासदार संजय राऊत यांनी सकाळच्या पत्रकार परिषदेत केली. त्यांनी शिवसेना, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी त्यांना भरभरून दिल्याचा सूर आळवला. वेळ देत नाहीत अशी सबब ते सांगू शकत नाहीत असा टोलाही राऊतांनी त्यांना लगावला. म्हणजे सचिन आहे हे सांगू शकत नाही की मला कोणी भेटत नव्हतं माझं कोणी ऐकत नव्हतं आदित्य ठाकरे आणि सचिन रोजच भेटत होते पाहिजे पुढल्या वाटचालीसाठी, भवितव्यासाठी पक्ष सोडत असल्याचे ते म्हणाले, यावरून राऊतांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
डोक्यात दगड घालून…
आम्हाला सगळ्यांना आत्मचिंतनाची गरज आहे. पक्ष हा शिवसैनिकच वाढवतो आणि बाकी सगळे जातात. सुनील शिंदे आदित्य ठाकरे दोन वेळा आमदार झाले. या काळामध्ये त्यांच्या राजकीय भविष्य घडवण्याचं काम आदित्य ठाकरे यांनी केले. त्यांना भारतीय कामगार सेनेचे कार्याध्यक्ष केलं. आता पुणे जिल्हा त्याच्या ताब्यात दिला. अजून एखाद्याला काय द्यायला पाहिजे? माणसाला समाधानी राहणं हे फार मोठा संस्कार आणि कला अजून काय मिळावं की त्याला समाधान मिळेल इतक्या मिळाल्यावर सुद्धा त्यांना वाटत असेल की माझी करिअर झाले नाही आणि त्यासाठी मी तुमच्यावरती आम्ही सगळ्यांनीच प्रेम केलं ठाकरे कुटुंबाने केलं शिवसेनेने केलं त्यांना अंधारात ठेवून झोपेत असताना डोक्यात दगड टाकून निघून गेला अशी विखारी टीका संजय राऊत यांनी सचिन अहिर यांच्यावर केली.
हे इमान मानत नाही. कोणाकडे गेले अजून काय देणार? अजून कुठेतरी उमेदवारी देणार. पण तुमचा जो राजकीय प्रवास आहे त्या राजकीय प्रवासामध्ये जागोजागी खड्डे दिसतात. तुम्ही सोडले, वाईट जरूर वाटले. पण त्यांनी असं करायला नको होतं. त्यांना सर्व काही मिळाले. सर्व काही दिलं. मान सन्मान प्रतिष्ठा पदासाठी गेले ते शोध हे सर्व दिल्याबद्दल एखादा माणूस जात असेल आणि त्याला फोडल्याबद्दल एकनाथ शिंदे विकट हास्य करतात. रावणाप्रमाणे हसतात, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. तर जे सहा खासदार फुटले. त्यातील पाच खासदार हे मुळचे काँग्रेसचे होते असे संजय राऊत म्हणाले.