अफजल गुरू, बुऱ्हान वाणीचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्तींना भाजपने बळ दिले; संजय राऊतांचा घणाघात

अफजल गुरू, बुऱ्हान वाणीचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्तींना भाजपने बळ दिले; संजय राऊतांचा घणाघात
sanjay raut

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, दहशतवादी अफजल गुरू, बुऱ्हान वाणीचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती या कधीकाळी भाजपच्या मैत्रीण होत्या. मेहबुबा यांच्या पार्टीचे चारित्र्य नेहमीच फुटीरतावादी, काश्मीरच्या समर्थनार्थ राहिले आहे. त्यानंतरही भाजपने त्यांच्याशी युती केली. सत्ता उपभोगली.

मनोज कुलकर्णी

|

Mar 27, 2022 | 10:55 AM

मुंबईः अफजल गुरू, बुऱ्हान वाणीचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांच्यासोबत भाजपने (BJP) सत्ता उपभोगली. त्याच काळात काश्मिरी पंडितांच्या हत्या झाल्या. भाजपनेच मेहबुबा मुफ्ती यांना बळ दिले आहे, असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलाय. ते मुंबईत बोलत होते. राऊत म्हणाले की, दहशतवादी अफजल गुरू, बुऱ्हान वाणीचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती या कधीकाळी भाजपच्या मैत्रीण होत्या. मेहबुबा यांच्या पार्टीचे चारित्र्य नेहमीच फुटीरतावादी, काश्मीरच्या समर्थनार्थ राहिले आहे. त्यानंतरही भाजपने त्यांच्याशी युती केली. सत्ता उपभोगली. काश्मिरी पंडितांवर त्याच काळात हल्ले झाले. आता त्याच मेहबुबा मुफ्ती काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी पाकिस्तानसोबत चर्चा करावी म्हणतातयत. या मेहबुबा मुफ्ती यांना भाजपनेच बळ दिले आहे. शिवसेनेने नेहमी या विचारधारेचा विरोध केला, अशी टोलेबाजी रविवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली.

तर मोदींचीही झोप उडेल

शिवसेना खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की, मोदी युगात चमच्यांची जागा अंधभक्तीने घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 24 पैकी 22 तास काम करतात, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे आहे. आता म्हणे मोदी यांना ती 2 तासांची झोप मिळू नये म्हणून संशोधन सुरू आहे. हे ऐकूण पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही झोप उडेल. बाकी कोणीच काम करत नाही. बायडेन, झेलन्स्की, पुतिन. सारे बिनकामाचे आहेत. मालिक तो महान है, बस चमचों से परेशान है, असा टोलाही त्यांनी यावेळी चंद्रकांत पाटील यांना लगावला. असे चमचे आम्ही पाहिले नाहीत, असा चिमटाही त्यांनी घेतला.

हिंदुत्वावरून लागली चढाओढ

भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर खरा हिंदुत्ववादी कोण, यावरून या दोन्ही पक्षात चढाओढ लागली आहे. मात्र, मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत भाजपने जम्मू आणि काश्मीरमध्ये केलेली युती आणि उपभोगलेली सत्ता यावरून शिवसेनेने नेहमीच भाजपवर तोंडसुख घेतले आहे. द काश्मीर फाइल्स चित्रपटावरून सध्या देशभरात राजकारण सुरूय. त्यानंतर आता त्याचा उल्लेख करत आज राऊतांनी पुन्हा एकदा भाजपला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला. आता याला भाजपकडून काय उत्तर मिळेल, हे पाहावे लागेल.

इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें