Sanjay Raut: अयोध्येत येतोय हे आम्हाला सांगावं लागलं नाही, संजय राऊतांनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचले

एका वाक्यात सोशल मीडियावर आलं ना असं म्हणते त्यांनी अयोध्येत आम्हाला सांगावं लागलं नाही, अयोध्येत आम्ही येतो जातो, लोक वाट बघत आहेत असंही त्यांनी सांगितले.

Sanjay Raut: अयोध्येत येतोय हे आम्हाला सांगावं लागलं नाही, संजय राऊतांनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचले
Image Credit source: tv9 marathi
महादेव कांबळे

|

May 08, 2022 | 4:15 PM

मुंबईः आमच्यावरही अनेक संकटं आली, पण आमच्या चेहऱ्यावर कधी तणाव पाहिला का. आपल्या चेहऱ्यावर तणाव दिसणं हा पहिला पराभव आहे. ज्यांना लढायचं ते त्यांच्या चेहऱ्यांवर चिंता तणाव दिसू देऊ नका. जो होगा देखा जायेगा. अशा काळात सामना कसा करायचा हे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackrey) यांनी शिकवलं असल्याचे सांगून या भोंगा आणि अयोध्येवरुन पेटलेल्या राजकारणावरु संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आता मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Raj Thackrey)यांनी डिवचले आहे. यावेळी बोलतान त्यांनी अनेक विषयांना हात घालत अयोध्या दौऱ्याविषयीही आपले मत मांडले. यावेळी त्यांनी सांगितले की, आपण अयोध्येत जातो.

एका वाक्यात सोशल मीडियावर आलं ना असं म्हणते त्यांनी अयोध्येत आम्हाला सांगावं लागलं नाही, अयोध्येत आम्ही येतो जातो, लोक वाट बघत आहेत असंही त्यांनी सांगितले.

करून करून काय करणार

विरोधकांवर बोलताना त्यांनी सांगितले की करून करून काय करणार आहेत हे तुरुंगात टाकणार ना,किती काळ टाकणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पण जेव्हा आम्ही येऊ तेव्हा अधिक डेंजर होऊन बाहेर येऊ,शिवसेनेशी लढणं तितकं सोपं नाही.

महाराष्ट्रात शिवसेना मजबूत

महाराष्ट्रात शिवसेना मजबूत आहे म्हणून राष्ट्रीय स्तरावर शिवसेनेला आव्हान देणं सोपं नाही असं ठणकावूनही संजय राऊत यांनी सांगितले. तर असे नसते तर दिल्लीवाले शिवसेनेच्या मानगुटीवर बसले असते त्यामुळे ही ठाकरेंची शिवसेना आहे. वारूळातून मुंग्या बाहेर पडतात तसे शिवसैनिक बाहेर येतात असं शिवसैनिकांविषयी बोलताना त्यांनी सांगितले.

जी भाषा वापरली जाते, त्याच भाषेत उत्तर

आपल्याबाबत ज्या पद्धतीने भाषा वापरली जाते. त्याच भाषेत त्यांना उत्तर दिलं पाहिजे. असली आ रहा है, नकली से सावधान असा जोरदार टोलाही मनसेला लगगवला आहे.

वैफल्य आलेली लोकं

यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाना साधत निराश आणि वैफल्य झालेली लोकं असून त्यातून ते आमच्यावर हल्ला करत आहेत तर काही जण गुन्हे दाखल करत असल्याचे सांगितले. विरोधकांच्या या हल्यामुळे आम्ही घाबरणा तर बिलकूल नाही कारण आम्ही लढ्यातील सेनापती नाही, शिवसैनिक आहोत. आमचे एकमेव सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आहेत. ना झुकेंगे ना बिकेंगे असे म्हणत ही शिवसेना असल्याचे त्यांनी सांगितले.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें