शरद पवार यांच्याविरोधात भाजप लिहून देईल तेच अजितदादा बोलतात; संजय राऊत यांचा गंभीर आरोप

मी कधीही खालच्या भाषेत टीका केली नाही. मी माझ्या पक्षाकडून विकासाचे बोलतो. मुद्द्याचं बोलतो. आजच्या संपादकीयमध्ये कुठे खालच्या भाषेत वाक्य आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

शरद पवार यांच्याविरोधात भाजप लिहून देईल तेच अजितदादा बोलतात; संजय राऊत यांचा गंभीर आरोप
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 28, 2023 | 12:20 PM

मुंबई | 28 ऑगस्ट 2023 : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गंभीर आरोप केला आहे. एकनाथ शिंदे असो की अजितदादा असो ते भाजपच्या लिखित अजेंड्यावर काम करत आहेत. त्यांच्या तोंडी वाक्य टाकली जात आहेत. उद्धव ठाकरे यांच्याविरोधात काही बोलायचं असेल तर त्यांना लिहून दिलं जातं. शरद पवार यांच्या विरोधात काही बोलायचं असेल, लिहायचं असेल तर तेही त्यांना लिहून दिलं जातं, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

आम्ही फुले-आंबेडकर यांची विचारधारा घेऊन जात असल्याचं अजित पवार वारंवार सांगत आहेत. त्यावरही संजय राऊत यांनी टीका केली. फुले-आंबेडकरांचे विचार कुठे आहेत? द्वेषाच्या भाषणा शिवाय काय आहे? लोकांमध्ये भांडणं लावली जात आहेत. फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा घेऊन जात असल्याचं अजितदादा म्हणत आहेत. भाजपमध्ये ती विचारधारा कुठे आहे?, असा सवालच संजय राऊत यांनी अजितदादा यांना केला आहे.

अमित शाह यांना आव्हान

आपल्या गटासोबत जे जे आले त्यांना शंभर कोटींचा निधी आणि त्यांचाच विकास ते करत आहेत. बाकीच्या आमदारांना तुम्ही कवडी देत नाही. हा कुठला विकास आहे? हजारो कोटींची लूट या निधीच्या मार्फत महाराष्ट्रात होत आहे. या लुटीची बरोबरी मी मेहुल चौक्सी, नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यांच्या लुटी सोबत करतो, असंही ते म्हणाले. सबका साथ सबका विकास तुम्ही म्हणता मग तसा विकास झाला पाहिजे. या लुटीची चौकशी व्हायला हवी. माझं अमित शाह यांना आव्हान आहे. करा चौकशी, असंही ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

मग इतरांना निधी का नाही?

तुम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे तर महाराष्ट्राच्या काही विशेष भागाचा विकास का करत आहात? आपण राज्याचे अर्थमंत्री आहात, राज्याचे मुख्यमंत्री आहात, आपण राज्याचे गृहमंत्री आहात, आपण राज्यात नियोजन मंत्री आहात, तरीही तुमच्यासोबत आलेल्यांचाच विकास का करत आहात. इतर भागांचा विकास करण्यासाठी निधी का दिला जात नाही? ते राज्यातील लोक नाहीत का? असा सवाल त्यांनी केला.

तेव्हा कुणाचं नेतृत्व स्वीकारणार

यावेळी संजय राऊत यांनी अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. 2024 नंतर तुम्ही कोणाचे नेतृत्व स्वीकारणार? 2024 नंतर या देशात आणि राज्यात सत्ता परिवर्तन होईल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.