कोल्हापुरात दोन वळू, शरद पवारांनी या दोन वळूंना… संजय राऊत यांचं मोठं आवाहन

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी कोल्हापूर गोकुळ निवडणुकीवरून भाजपच्या दोन मंत्र्यांवर हल्ला चढवला आहे. राऊत यांनी त्यांना 'वळू' संबोधत, लोकशाहीला धोका असल्याचे म्हटले. ईडीच्या भीतीने पळणारे हे मंत्री शरद पवारांनी दारात उभं करू नयेत, असे आवाहन त्यांनी केले. निवडणुकीतील हे 'तांडव' महाराष्ट्राच्या राजकारणाला घातक असल्याचे राऊत यांचे म्हणणे आहे.

कोल्हापुरात दोन वळू, शरद पवारांनी या दोन वळूंना... संजय राऊत यांचं मोठं आवाहन
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 11, 2026 | 11:08 AM

कोल्हापुरात दोन वळू आहेत. दोघेही मंत्री आहेत. या वळूंनी काल उच्छाद मांडला. पण एक दिवस या दोन वळूंना पळून जाण्याची वेळ येणार आहे. त्यावेळी शरद पवार यांनी या दोन्ही वळूंना आपल्या दारात उभं करू नये, असं आवाहन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना केलं आहे. गोकुळची कालची निवडणूक आपल्याला मान्य नाही. सतेज पाटील यांचं पॅनल जिंकलेलं असताना तुम्ही विजय ओरबाडून घेतला. इतिहासातील हा काळाकुट्ट दिवस होता, असा हल्लाही संजय राऊत यांनी चढवला.

गोकुळची निवडणूक काल पार पडली नाही. जे काल घडलं, त्याला निवडणूक म्हणत नाही. निवडणूक ही 25 सदस्यांमध्येच व्हायला पाहिजे. त्यामध्ये 13चं बहुमत समविचारी पॅनलकडे आहे. शेतकऱ्यांनी निवडून दिलेलं पॅनल आहे. त्यांचे 13 सदस्य आहेत. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांच्या दबावाखाली चार सदस्य नेमले. कारण शाहांना गोकुळ अमूलच्या घशात घालायचं आहे. त्यासाठी कोल्हापुरातील दोन वळू, दोन मंत्री, त्यांनी जे तांडव केलं. त्याचा परिणाम दिसला. याला निवडणूक म्हणत नाही. याला लादणं आणि ओरबाडणं म्हणतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Loading...

ईडीला घाबरून…

कोल्हापुरात काल जो प्रकार घडला, तो लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे. याचे परिणाम महाराष्ट्रात होतील. भाजपच्या सत्तेला सुरुंग लावण्याचं काम काल कोल्हापुरातील लादलेल्या निवडणुकीने झालं आहे. हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील हे खालच्या पातळीवर वागले. त्यांना असं वागणं शोभत नाही. जे कोल्हापूरशी नातं सांगतात त्यांना हे शोभत नाही. जे ईडीला घाबरून ढुंगणाला पाय लावून पळून गेले, ते काल शड्डू ठोकताना पाहिल्यावर आश्चर्य वाटलं. राजकारणात दिवस बदलत असतात. दिवस चंचल असतात. तेव्हा पळून जायची तुमच्यावर वेळ येईल, हे माझं भाकीत आहे. तेव्हा या वळूंना कुणी दारात उभं करू नये. विशेषता शरद पवारांनी या वळूंना दारात उभं करू नये, असं आवाहन राऊत यांनी केलं.

अदानीही स्कूटरवर फिरायचे

डीवाय पाटील हे स्कूटरवर फिरत होते. तुमची संपत्ती जाहीर करा, असं आव्हानच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांना दिलं आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे स्वत: मर्द नसतात, त्यांना दुसऱ्यांच्या शौर्याचा द्वेष वाटतो. त्यांना दुसऱ्यांची कर्तबगारी डोळ्यात खुपते. डी वाय पाटील स्कूटरवर फिरत होते. याचा आणि गोकुळचा काय संबंध आहे? या व्यक्तीने कर्तृत्वावर जगभरात साम्राज्य उभं केलं. आम्हाला त्यांचं कौतुक आहे. मराठी माणसाचं कौतुक आहे. मोदी चहा विकायचे. त्यांचं साम्राज्य कसं उभं राहिलं? अदानी स्कूटरवर फिरत होते. त्यांचं साम्राज्य कसं उभं राहिलं. चंद्रकांत पाटलांनी अदानीला हाच सवाल करावा. त्यांची अदानींशी भेट घालून देतो, असा हल्लाही त्यांनी चढवला.

पैसा कुठून आला?

तुम्ही जे पैसा वाटता तो कुठून येतो? 10-10 हजाराला कोथरूडला मते विकत घेतली तो पैसा कुठून आला? तंत्र शिक्षण खात्यातून आली की महसूल मंत्री असताना तिथून आला? मंत्री विध्वंसाची भाषा करतो. हातात सत्ता असल्यावर कुत्र्यालाही वाटतं मी सिंह आहे. पण हे तर वळू आहेत, असंही ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us