Sharad Pawar Video : उद्धव ठाकरेंचा फोन आला तर शरद पवारांचा संवाद कसा असेल? आजच्या प्रेस कॉन्फरन्समधला हा अनपेक्षीत संवादाचा Video बघा

या पत्रकार परिषेदच्या सुरूवातीला एक अशी घटना घडली. जिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पवारांनी नंतर बलतो म्हणत पत्रकार परिषदेच्या सुरूवातीलाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा फोन कट केला.

Sharad Pawar Video : उद्धव ठाकरेंचा फोन आला तर शरद पवारांचा संवाद कसा असेल? आजच्या प्रेस कॉन्फरन्समधला हा अनपेक्षीत संवादाचा Video बघा
उद्धव ठाकरेंचा फोन आला तर शरद पवारांचा संवाद कसा असेल? आजच्या प्रेस कॉन्फरन्समधला हा अनपेक्षीत संवादाचा Video बघाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 01, 2022 | 9:26 AM

मुंबई : शरद पवारांनी (Sharad Pawar) मोठ्या कष्टानं उभा केलेलं महाविकास आघाडी सरकार पडलं आणि आज राज्यात नवं सरकार उभा राहिलंय. या नव्या सरकारची धुरा ही मुख्यमंत्र्यांच्या रुपाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मिळाली आहे. सरकार वाचवण्यासाठी पवारांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला. मात्र सरकार सर्व काही करून गेलं. नवं सरकार अस्तत्वाच येताच आप पवारांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी नव्या सरकारला शुभेच्छाही दिल्या तर दुसरीकडे फडणवीसांना त्यांच्या उपमुख्यमंत्रिपदावरून कोपरखळ्याही मारल्या. मात्र या पत्रकार परिषेदच्या सुरूवातीला एक अशी घटना घडली. जिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पवारांनी नंतर बलतो म्हणत पत्रकार परिषदेच्या सुरूवातीलाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा फोन कट केला. या घटनेची सध्या जास्त चर्चा आहे.

पत्रकार परिषदेवेळचा व्हिडिओ

पत्रकार परिषदेवेळी नेमकं काय घडलं?

पवारांच्या पत्रकार परिषदेच्या अगदी सुरूवातीलाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना फोन केला. आता उद्धव ठाकरेंचा फोन आहे म्हटल्यावर पवारांनी तो फोन घेतलाही. मात्र साहजिकच पत्रकार परिषदेला बसलेल्या पवारांना मनमोकळीपणे बोलता आलं नसतं. त्यामुळे पवारानी हेलॉ, नमस्कार… एका प्रेस कॉन्फरन्समध्ये बसलोय, असे उद्धव ठाकरेंना सांगत फोन ठेवला. पवारांनी उद्धव ठाकरेंना मी एक अर्धा तासाने फोन करतो म्हणूनही सांगितलं. तर आजुबाजुच्या लोकांनाही त्यांना सांगा फोन देऊन नका, असे म्हणत फोन न देण्याच्या सूचना दिल्या.

पत्रकारांना थेट सांगूनही टाकलं

मात्र काही वेळातच पत्रकारांनी उद्धव ठाकरे आणि तुमचं काही बोलणं झालं का? असा सवाल पवारांना केला. त्यामुळे हो आत्ताच फोन आलेला मात्र पत्रकार परिषद सुरू असल्याचे तुमच्या समोरच ठेवला म्हणत पवारांनी खरंही सांगून टाकलं. पवारांच्या या ठेवण्याच्या स्टाईलची आणि आत्ताच बोलणं झालं म्हणून सांगून टाकण्याचीही आता सोशल मीडियावर चर्चा आहे. अनेक राजकीय चर्चा या मीडियासमोर केल्या जात नाही. मात्र अनेकदा मध्येच आलेल्या फोनमुळे अनेक नेत्यांचे संवादही व्हायरल होता. मात्र तसं न होऊ देता पवार पुरेशी काळजी घेताना दिसून आले.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.