AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde: शिवसेना म्हणते आमचा, शिंदे म्हणतात आमचा, पवार काय म्हणतात? नियमांनुसार व्हीप नेमका कुणाचा लागू होणार?

दोन्ही शिवसेनेच्या वादात कायदेशीरदृष्ट्या व्हीप नेमका कुणाचा लागू होँणार, हा वाद पेटण्याची शक्यता आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाने अधिकृतरित्या काढलेला व्हीप पाळावाच लागेल, असे सांगितले आहे. जर व्हीप पक्षाच्या उमेदवारांनी पाळला नाही तर त्यांच्यावर अपत्राततेची कारवाई होऊ शकते. मात्र उद्या विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ काय भूमिका घेणार, यावर सगळे ठरणार असल्याचे सांगितले जाते आहे.  

Eknath Shinde: शिवसेना म्हणते आमचा, शिंदे म्हणतात आमचा, पवार काय म्हणतात? नियमांनुसार व्हीप नेमका कुणाचा लागू होणार?
मुख्यमंत्र्यांची घणाघाती टीका Image Credit source: tv9
| Edited By: Sandip Sakhare | Updated on: Jul 02, 2022 | 7:54 PM
Share

मुंबई- एकनाथ शिंदे (Eknath Shinde)सरकारची पहिलीच परीक्षा ठरणारे पहिले विशेष अधिवेशन उद्यापासून दोन दिवस मुंबईत पार पडणार आहे. पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची (Assembly Speaker)निवड करण्यात येणार आहे. आता या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दोन व्हीप लागू होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray)शिवसेनेकडून प्रतोद असलेल्या सुनील शिंदे यांनी एक व्हीप काढून, शिवसेनेच्या सर्व आमदारांनी आघाडीचे महाविकास उमेदवार राजन साळवी यांना मतदान करण्याचा व्हीप काढण्यात आला आहे. तर एकनाथ शिंदे गटाकडून प्रतोद भारत गोगावले हेही शिंदे – फडणवीस सरकारचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान करावे, असा व्हीप जारी करण्याची शक्यता आहे. आता या दोन्ही शिवसेनेच्या वादात कायदेशीरदृष्ट्या व्हीप नेमका कुणाचा लागू होँणार, हा वाद पेटण्याची शक्यता आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाने अधिकृतरित्या काढलेला व्हीप पाळावाच लागेल, असे सांगितले आहे. जर व्हीप पक्षाच्या उमेदवारांनी पाळला नाही तर त्यांच्यावर अपत्राततेची कारवाई होऊ शकते. मात्र उद्या विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ काय भूमिका घेणार, यावर सगळे ठरणार असल्याचे सांगितले जाते आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटाचे काय म्हणणे?

शिवसेनेतून जरी ३९ आमदार फुटले असले तरी त्यांच्या गटाला अद्याप अधिकृत मान्यता मिळालेली नाही. एकनाथ शिंदे ज्यादिवशी सूरता गेले तयाचदिवशी त्यांचे विधिमंडळ गटनेते पद काढून घेण्यात आले होते आणि ते अजय चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आले. अधिकृत रित्या आता सुनील प्रभूंची नियुक्ती प्रतोदपदी केल्याचा दावा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे. तसेच राष्ट्रीय कार्याकारिणीतही सर्वांनी याबाबत कारवाईचे सर्व अधिकार हे उद्धव ठाकरेंना दिले आहेत. पक्षफुटीसाठी लागणारी थेट फूट अद्याप पक्षात पडलेली नसल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. त्यामुळे सुनील प्रभू यांनी काढलेला व्हीपच लागू होईल, तो व्हीप न मानणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते, असा दावा सुनील प्रभूंच्या वतीने करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

तर गोव्यात मुक्कामाला असलेल्या आमदरांना घेण्यासाठी आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा व्हीप बेकायदेशीर असल्याचे म्हणले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा व्हीप आपल्याला लागू होत नाही, कारण दोन तृतियांश आमदार हे आपल्यासोबत असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. त्यामुळे उद्या आपलाच विधानसभा अध्यक्षांचा उमेदवार निवडून येईल, असा दावा शिंदे यांनी गोवा विमानतळावर बोलताना केला आहे.

शरद पवार काय म्हणाले?

याबाबत शरद पवारांनी पक्षाचा व्हीप पाळावा लागत असल्याचे सांगितले. मात्र विधिमंडळातील पक्ष वेगळा आणि बाहेरचा पक्ष वेगळा असे त्यांनी सांगितले. विधानसभा अध्यक्ष आता याबाबतचा निर्णय घेतील, असे सांगत त्यांनी ही जबाबदारी उपाध्यक्ष नरहरी झिरवळांची असल्याचे सांगितले आहे. कायदेशीर कचाट्यात हा प्रश्न अडकेल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी पद्धतीने होणार

उद्या सभागृहात विधानसभा अध्यक्षांची निवड ही आवाजी मतदानाने होणार आहे. आता सभागृहात जर यावर गुप्त मतदान झाले असते तर व्हीप बजावूनही काही उपयोग झाला नसता. मात्र आता आवाजी मतदानाने अध्यक्षांची निवड होणार आहे. अशा वेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष असेल. त्यांनी सुरुवातीलाच यावर आक्षेप नोंदवला तर पुढे यात कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो. सध्या तरी शिंदे-फडणवीस यांच्याकडे बहुमताचा आकडा दिसतो आहे. त्यामुळे उद्या सभागृहात काय घडेल, हा  प्रश्न कायदेशीर कचाट्यात सापडेल का, याची उत्सुकता सगळ्यांनाच असेल.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?