AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी, उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना फोन करण्यासाठी तयार

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन करण्यासाठी तयार आहेत. स्वत: उद्धव ठाकरे यांनी खासगीत याबाबतचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

सर्वात मोठी बातमी, उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना फोन करण्यासाठी तयार
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Aug 07, 2023 | 4:49 PM
Share

मुंबई | 7 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्रातील सर्वात जास्त चर्चेत येणारा विषय आता पुन्हा चर्चेत आला आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार का? या प्रश्नावरुन पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावं, अशी दोन्ही पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे. याशिवाय सर्वसामान्य जनतेमधील अनेकांची तशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्याकडून त्यासाठी प्रयत्न देखील करण्यात आले. पण उद्धव ठाकरे यांच्याकडून हवा तसा सकारात्मक प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या फक्त चर्चाच सुरु असतात. पण या चर्चांना आणखी खतपाणी घालणारी नवी बातमी समोर आली आहे.

उद्धव ठाकरे यांनी आज खासगीत मोठं वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन करण्यास तयार असल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांनी खासगीत याबाबतचं वक्तव्य केलं आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना फोन करण्यासाठी तयार असल्याची माहिती मिळत आहे. वेळ आल्यास राज ठाकरे यांच्याशी बोलणार, असं उद्धव ठाकरे खासगीत म्हणाले आहेत.

राज ठाकरे यांच्याकडे बाळासाहेबांचे भाषण संग्रहित

राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे संग्रहित केली होती. 1966 ते 1990 या काळातील बाळासाहेब ठाकरे यांची भाषणं श्रीकांत ठाकरे यांनी ग्रामोफोनमध्ये रेकॉर्ड केली होती. त्यावेळी टीव्ही नव्हता. त्यामुळे ग्रामोफोनमध्ये ती भाषणं रेकॉर्ड करण्यात आली होती. ती भाषणे राज ठाकरे यांच्याकडे आहेत. याच भाषणांसाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना फोन करण्याची शक्यता आहे.

‘बाळासाहेबांचं भाषण मोठं की तुमचा इगो मोठा?’

दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली आहे. “जेव्हा 2017 ला फोन केला होता तेव्हा राज ठाकरे यांनी कुणाला मध्ये नव्हतं घातलं की, तू फोन उचलणार असेल तर त्याला फोन करतो. त्यांना वाटलं, त्यांनी फोन केला. तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही फोन करा”, असं संदीप देशपांडे म्हणाले.

“मला एक सांगा, बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक चांगलं व्हावं, म्हणून तुम्हाला ती भाषणं हवी आहेत. मग बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी तुमचा इगो का मध्ये येत आहे? तू उचलणार असशील तर फोन करतो, हा इगो कशाला? बाळासाहेबांचं भाषण मोठं की तुमचा इगो मोठा?”, असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?