शिवसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: Namrata Patil

Updated on: Jun 17, 2021 | 6:44 AM

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून शिवसेना भवन समोर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (Shivsena BJP rada at Shivsena Bhavan case has been registered Against 7 Shivsena and 30 BJP Activist)

शिवसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
Shivsena BJP Rada

मुंबई : राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजप युवा मोर्चाने काढलेल्या फटकार मोर्चात मोठा राडा झाला. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह महिला कार्यकर्त्यांनाही शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी भाजपसह शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबईतील शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या तब्बल 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Shivsena BJP rada at Shivsena Bhavan case has been registered Against 7 Shivsena and 30 BJP Activist)

शिवसेनेच्या 7 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा 

मिळाेलल्या माहितीनुसार, शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी दुपारी आंदोलनादरम्यान झालेल्या गोंधळाप्रकरणी शिवसेनेच्या चंदू झगड़े, राकेश देशमुख, अभय तमोरेंसह इतर 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 143, 147, 149, 392, 324, 323, 354, 509 यांसह विविध कलमांतर्गत दाखल करण्यात आला आहे.

भाजपच्या 30 जणांवर गुन्हा

तर दुसरीकडे भाजपा युवा मोर्चाच्या तजिंदर सिंह तिवाना (आयोजक), अजित सिंह आणि इतर एकूण 30 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 188, 269 IPC, 51 तसेच राष्ट्रीय आपात्कालीन कायद्याच्या उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास शिवाजी पार्क पोलिसांकडून केला जात आहे.

भाजप-शिवसेनेच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त

दरम्यान शिवसेना भाजप कार्यकर्ता राडा प्रकरण लक्षात घेऊन पुढे काही अप्रिय घटना घडू नये, तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून शिवसेना भवन समोर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय भाजपा मुंबई कार्यालय बाहेर ही पोलिस बल तैनात करण्यात आले आहे.

शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा भाजप कार्यकर्त्यांचा आरोप

अयोध्येतील श्री राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप केल्याचा दावा करत भाजपने फटकार मोर्चा आयोजित केला आहे. भाजप युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मात्र शिवसेना भवनापासून 5 किमी अंतरावरच पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अडवलं आणि ताब्यात घेतलं. पोलिसांच्या व्हॅनमधून भाजप कार्यकर्त्यांना घेऊन जात असताना शिवसेना भवनासमोर उपस्थित असलेल्या शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

आंदोलन आणि संभाव्य वाद टळला असं चित्र दिसत असतानाच दुसरीकडे मोठा गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यावेळी काही शिवसैनिकांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला जातोय. भाजपच्या काही कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करण्यात आलीय. तर महिलांनाही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

(Shivsena BJP rada at Shivsena Bhavan case has been registered Against 7 Shivsena and 30 BJP Activist)

संबंधित बातम्या : 

Video : शिवसेना भाजप वाद; किशोरी पेडणेकरांकडून बाळासाहेबांचा व्हिडीओ ट्वीट करत भाजपला इशारा

भाजप महिला कार्यकर्त्यांना मारहाणीचा आरोप, माजी महापौर श्रद्धा जाधवांसह 7 शिवसैनिकांवर गुन्हा, अटकेसाठी भाजपचा ठिय्या

शिवसेना नव्हे, ही तर खिल्जी सेना,सेनेवर हल्लाबोल करणाऱ्या अक्षता तेंडुलकर नेमक्या कोण?

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI