शिवसेना नव्हे, ही तर खिल्जी सेना,सेनेवर हल्लाबोल करणाऱ्या अक्षता तेंडुलकर नेमक्या कोण?

Who is Akshata Tendulkar : राम मंदिराच्या कथित जमीन (Ram Mandir Land) घोटाळ्याच्या मुद्द्यावरुन आज मुंबईत तुफान धुमश्चक्री झाली. शिवसेना आणि भाजप (Shiv Sena BJP) कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोर प्रचंड हाणामारी केली.

शिवसेना नव्हे, ही तर खिल्जी सेना,सेनेवर हल्लाबोल करणाऱ्या अक्षता तेंडुलकर नेमक्या कोण?
Akshata Tendulkar

मुंबई : राम मंदिराच्या कथित जमीन (Ram Mandir Land) घोटाळ्याच्या मुद्द्यावरुन आज मुंबईत तुफान धुमश्चक्री झाली. शिवसेना आणि भाजप (Shiv Sena BJP) कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोर प्रचंड हाणामारी केली. भाजप युवा मोर्चाने (BJP Yuva Morcha) शिवसेनेचे आरोप बिनबुडाचे असल्याचा आरोप करत, माफी मागण्यासाठी थेट शिवसेना भवनावर (Shiv Sena Bhawan) मोर्चा काढला. मात्र या मोर्चाची कुणकुण लागल्याने, सेना भवनासमोर आधीच शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जमले होते. ज्यावेळी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना सोनिया सेना अशा घोषणा देण्यास सुरुवात केली, त्यावेळी बाचाबाचीला सुरुवात झाली. या बाचाबाचीनंतर थेट हाणामारीला सुरुवात झाली. (Shiv Sena vs BJP rada near Shiv Sena Bhawan Mumbai who is Akshata Tendulkar)

शिवसैनिकांनी भाजप युवा मोर्चाचे विलास आंबेकर, सनी साठे, ऋषी शेळमकर यांच्यावर हल्ला केला. त्यांना मारहाणही करण्यात आली. मात्र त्याचवेळी भाजपच्या माहिम विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्ष अक्षता तेंडुलकर यांनाही शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. शिवसैनिकांनी आपल्यावर-एका महिलेवर हात उचलला, ही शिवसेना नव्हे, ही तर खिल्जीसेना आहे, यांचं कसलं हिंदुत्व असा हल्लाबोल अक्षता तेंडुलकर यांनी केला.

गुंडा सेना, हप्तावसुलीवाले आले आहेत हे, आमचे युवा मोर्चेवाले आले, गाडीने जात होतो आम्ही, हे सेनावाले आले आणि आम्हाला मारायला लागले, यांच्या बापाचं आहे का दादर? शिवसेना नव्हे खिल्जीसेना आहे ही, एका बाईवर हात उचलला, यांना हिंदुत्वाचं काही पडलं नाही, असा हल्लाबोल अक्षता तेंडुलकर म्हणाल्या.

कोण आहेत अक्षता तेंडुलकर?

अक्षता तेंडुलकर या भाजपच्या माहिम विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्षा आहेत

अक्षया तेंडुलकर यांची गेल्या वर्षी माहिम विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

कोरोनाच्या काळात त्यांनी या परिसरात अनेक सामाजिक कार्य केले

भाजप माहिम महिला मोर्चाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली

त्यांच्या कामाचा धडाका पाहून त्यांची माहिम विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागली

संबंधित बातम्या 

VIDEO: अंगावर याल तर शिंगावर घेऊच; महापौर किशोरी पेडणेकर कडाडल्या    

VIDEO: शिवसेना भवनासमोरील आंदोलनात राडा, शिवसैनिकांकडून मारहाण झाल्याचा भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांचा आरोप!   

VIDEO: “आम्ही बाळासाहेबांच्या रणरागिणी आहोत”, मुंबईतल्या राड्यानंतर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या प्रतिक्रिया 

(Shiv Sena vs BJP rada near Shiv Sena Bhawan Mumbai who is Akshata Tendulkar)