VIDEO: “आम्ही बाळासाहेबांच्या रणरागिणी आहोत”, मुंबईतल्या राड्यानंतर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या प्रतिक्रिया

शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये आज तुफान राडा झाला आहे. मुंबईच्या दादर येथील शिवसेना भवनासमोर हा सर्व राडा झाला (shiv sena women workers aggression on clashes between bjp yuva morcha and shiv sena near sena bhawan).

VIDEO: आम्ही बाळासाहेबांच्या रणरागिणी आहोत, मुंबईतल्या राड्यानंतर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या प्रतिक्रिया
शिवसेनेची महिला आघाडी आक्रमक
Follow us
| Updated on: Jun 16, 2021 | 5:23 PM

मुंबई : शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये आज तुफान राडा झाला आहे. मुंबईच्या दादर येथील शिवसेना भवनासमोर हा सर्व राडा झाला. भाजप कार्यकर्ते शिवसेना भवनासमोर आंदोलन करण्यासाठी येत होते. मात्र, पोलिसांनी त्यांना शिवसेना भवनापासून लांब पाच किलोमीटर अंतरावर रोखलं. तरीदेखील काही भाजप कार्यकर्ते आणि शिवसेना हे आमनेसामने आल्याची दुर्देवी घटना घडली. या घटनेत भाजपचे काही कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या गदारोळानंतर शिवसेनेच्या महिला आघाडीने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. यावेळी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी भाजपवर सडकून टीका केली (shiv sena women workers aggression on clashes between bjp yuva morcha and shiv sena near sena bhawan).

शिवसेना भवनासमोर शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये महिलांचा देखील मोठा सहभाग होता. शिवसेनेच्या या महिला आघाडीचं नेतृत्व मुंबई महापालिकेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी केलं. या गदारोळानंतर शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपला रोष व्यक्त केला (shiv sena women workers aggression on clashes between bjp yuva morcha and shiv sena near sena bhawan).

शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी नेमकं काय म्हणाले?

“सुरुवात आम्ही केली नाही. सुरुवात त्यांनी केली. आम्ही शांतपणे सेना भवनजवळ असलेल्या पेट्रोलपंपावर उभे होतो. जेव्हा आम्हाला कळलं, भाजपचे कार्यकर्ते सेनाभवनावर हल्ला करणार तेव्हा आम्ही पेट्रोलपंपाजवळ उभे होतो. नंतर आम्हाला कळंल ते तिथून सेना भवनात येत आहेत, म्हणून आम्ही शांतपणे इथे घोषणा देत होतो. आमचे कार्यकर्ते उपस्थित होते. सुरुवात त्यांनी केली. त्यांच्या सुरुवातीमुळे हा सगळा प्रकार झाला. आम्ही आंदोलनाला नाही म्हटलंच नाही. त्यांनी आंदोलन केलं. आम्ही सेना भवनाचं रक्षण केलं. आम्ही त्यांच्यावर हल्ला केला नाही”, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या महिला आघाडीचं नेतृत्व करणाऱ्या श्रद्धा जाधव यांनी प्रतिक्रिया दिली.

भाजपला यापुढेही असंच उत्तर देणार का? असं प्रश्न विचारला असता “या बाळासाहेबांच्या रणरागिणी आहेत. त्यांच्यात हिंमत होती तर समोर यायचं होतं. फाडून काढलं असतं एकेकाला”, अशी प्रतिक्रिया एका महिलेने दिली.

नेमकं काय घडलं ?

अयोध्येतील श्री राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप केल्याचा दावा करत भाजपने फटकार मोर्चा आयोजित केला आहे. भाजप युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मात्र शिवसेना भवनापासून 5 किमी अंतरावरच पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अडवलं आणि ताब्यात घेतलं. पोलिसांच्या व्हॅनमधून भाजप कार्यकर्त्यांना घेऊन जात असताना शिवसेना भवनासमोर उपस्थित असलेल्या शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

आंदोलन आणि संभाव्य वाद टळला असं चित्र दिसत असतानाच दुसरीकडे मोठा गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यावेळी काही शिवसैनिकांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला जातोय. भाजपच्या काही कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करण्यात आलीय. तर महिलांनाही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

शिवसेना महिला आघाडी नेमकं काय म्हणाली ते बघा ?

संबंधित बातम्या :

PHOTOS : राम मंदिर जमीन घोटाळ्यावरुन सेना भवनासमोर राडा, शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड हाणामारी

‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा, पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी’ अतुल भातखळकरांचा शिवसेनेला इशारा

भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला झाला असेल तर योग्य कार्यक्रम करू; निलेश राणेंचा इशारा

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.