मुंबई : अयोध्येतील राम मंदिर भूखंड खरेदीत घोटाळा झाल्याच्या आरोपावरुन आता राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरु झाला आहे. भाजप युवा मोर्चाकडून आज शिवसेना भवनावर फटकार मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसैनिकांकडून काही भाजप पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. तत्त्पूर्वी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शिवसेनेनं केलेल्या टिकेला जोरदार प्रत्युतर दिलं आहे. (Atul Bhatkhalkar responds to Sanjay Raut’s criticism on Ram Mandir issue)