AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: शिवसेना-भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले, सेना भवनसमोर राडा; अनेकांची धरपकड!

अयोध्येतील राम मंदिर भूखंड खरेदीत (Ayodhyas Ram Mandir land) झालेल्या घोटाळ्यावरून शिवसेनेने टीका केली होती. त्याचा निषेध म्हणून भाजपच्या युवा मोर्चाने आज दादरच्या शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढला.

VIDEO: शिवसेना-भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले, सेना भवनसमोर राडा; अनेकांची धरपकड!
bjp workers
| Edited By: | Updated on: Jun 16, 2021 | 5:22 PM
Share

मुंबई: अयोध्येतील राम मंदिर भूखंड खरेदीत झालेल्या घोटाळ्यावरून शिवसेनेने टीका केली होती. त्याचा निषेध म्हणून भाजपच्या युवा मोर्चाने आज दादरच्या शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढला. मात्र, शिवसेना भवनासमोर शिवसैनिकही मोठ्या संख्येने जमल्याने पोलिसांनी या आंदोलकांना सेना भवनापासून पाच किलोमीटर अंतरावरच अडवलं. तसेच या मोर्चकऱ्यांची धरपकड करण्यात आली. मात्र, दोन्ही पक्षांमधील संघर्ष टळला असं वाटत असतानाच भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते अचानक भिडल्याने सेना भवन परिसरात तणाव निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून शिवसैनिकांचीही धरपकड केली. (clashes between BJP Yuva morcha and Shiv Sena near sena bhawan)

भाजप युवा मोर्चाचे तेजिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली या फटकार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. राम मंदिर भूखंड घोटाळ्यावरून शिवसेनेने केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून युवा मोर्चाने आंदोलन पुकारले होते. भाजपच्या युवा मोर्चाचा मोर्चा शिवसेना भवनावर येणार असल्याची कुणकुण लागताच शिवसेनेनेचे आमदार सदा सरवणकर यांच्यासह शेकडो शिवसैनिक शिवसेना भवना समोर जमले. जशास तसे उत्तर देण्याच्या इराद्यानेच शिवसैनिक सेना भवनासमोर जमले होते. त्यामुळे दोन्ही पक्षात मोठी धुमश्चक्री उडण्याची चिन्हे दिसत होती. त्यामुळे सेना भवनासमोर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सेना भवनासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जवांनाही या ठिकाणी तैनात करण्यात आले होते.

‘सोनिया सेना हाय हाय’च्या घोषणा

त्यानंतर दुपारी भाजपचे कार्यकर्ते घोषणा देतच राजाराणी चौकात आले. यावेळी ‘सोनिया सेना हाय हाय’च्या घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेना भवनापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर हा मोर्चा येताच पोलिसांनी हा मोर्चा अडवला. त्यामुळे आंदोलक अधिकच आक्रमक झाल्याने पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड करून त्यांना व्हॅनमध्ये कोंबले.

अन् शिवसैनिकांकडून पाठलाग

दरम्यान, पोलिसांची व्हॅन या आंदोलकांना घेऊन शिवाजी पार्ककडे निघाली. तेव्हा व्हॅन येताच काही शिवसैनिक व्हॅनच्या दिशेने धावले. आंदोलकांना पकडण्यासाठी शिवसैनिक धावले होते. मात्र, व्हॅन सुसाट गेल्याने भाजप कार्यकर्ते शिवसैनिकांच्या हाती लागले नाहीत.

शिवसैनिकांचीही धरपकड

दरम्यान, मोर्चा संपला असं वाटत असतानाच अचानक शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. शिवसैनिकांनी भाजपच्या काही कार्यकर्त्यांना चोप दिला. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी काही शिवसैनिकांची धरपकडही सुरू केली. आम्ही गाडी करून चाललो असताना शिवसैनिकांनी आम्हाला मारलं असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. (clashes between BJP Yuva morcha and Shiv Sena near sena bhawan)

संबंधित बातम्या:

भाजपचा शिवसेना भवनावर फटकार मोर्चा, उत्तर देण्यासाठी शिवसैनिकही एकवटले

झिशान सिद्दीकींची भाई जगतापांविरोधात राहुल, सोनियांकडे तक्रार, भाई म्हणतात, त्याचं जेव्हढं वय, त्यापेक्षा जास्त माझी कारकीर्द

आता ओबीसींचा गुरुवारी ‘आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा’, छगन भुजबळ करणार नेतृत्व!

(clashes between BJP Yuva morcha and Shiv Sena near sena bhawan)

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?