Sanjay Pawar : डमी आहे का फॉर्म? पत्रकारांच्या प्रश्नावर संजय पवार म्हणतात, बॉस इज ऑलवेज राईट !

कोल्हापूरातील संजय पवार यांना उमेदवारी जाहीर होताच संभाजी छत्रपती यांनी शह देण्यासाठीच संजय पवार यांना तिकीट दिले असल्याचेही बोलले जात आहे.

Sanjay Pawar : डमी आहे का फॉर्म? पत्रकारांच्या प्रश्नावर संजय पवार म्हणतात, बॉस इज ऑलवेज राईट !
Image Credit source: tv9
| Updated on: May 24, 2022 | 6:01 PM

कोल्हापूरः गेल्या 25 ते 30 वर्षांपासून ते शिवसेनेत (Sivsena) कार्यरत असणाऱ्या कोल्हापूच्या शिवसेनेचा मावळा संजय पवार (Sanjay Pawar) यांना राज्यसभेची उमेदवारी (Rajyasabha Candidate) जाहीर झाली आहे. शिवसेनेचे ग्रामीण भागातील कणखर नेतृत्व म्हणून संजय पवार यांची ओळख आहे. त्यांना उमेदवारी जाहीर होताच पत्रकारांनी त्यांना राज्यसभेच्या उमेदवारीविषयी विचारले असता ते म्हणाले की, डमी आहे का फॉर्म? या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले की, बॉस इज ऑलवेज राईट असे सांगत त्यांनी उत्तर दिले.

कोल्हापूरातील संजय पवार यांना उमेदवारी जाहीर होताच संभाजी छत्रपती यांनी शह देण्यासाठीच संजय पवार यांना तिकीट दिले असल्याचेही बोलले जात आहे.

संभाजीराजे विरुद्ध संजय पवार असा सामना

त्या त्यादृष्टीकोनातून सर्वसामान्य शिवसैनिकाला संधी देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचेही शिवसेनेचे नेते सांगत आहेत. त्यामुळे संभाजीराजे विरुद्ध संजय पवार असा सामना याठिकाणी पाहायला मिळणार असण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.

ज्यांच्याकडे 42 मते असतील ते निवडून येतील

संजय पवार यांना उमेदवारी जाहीर होताच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सध्या तरी संभाजी छत्रपतींना पाठिंबा नाही मात्र आजच नोटिफिकेशन आले असल्याने संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली असल्याचे त्यांनी सांगितले. संजय पवार आणि संभाजी छत्रपती यांच्या उमेदवारीविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, ज्यांच्याकडे 42 मते असतील ते निवडून येतील आणि त्यानंतर या उमेदवारीविषयी अधिकृत घोषणाही लवकरच होईल असंही त्यांनी संजय राऊत यांनी सांगितले.

पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य

संजय पवार यांना उमेदवारीविषयी विचारल्यानंतर सांगितले की, पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असणार आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, शिवसेनेचा चढउतार आम्ही गेली तीस वर्षे पाहिला आहे. त्यामुळे संधी दिली तर आम्ही लढायलाही तयार आहोत. तसेच आम्हाला छत्रपतींच्या घराबाबत आदर आहे त्यामुळे राजेंकडून माझा अपमान व्हावा असं मला वाटतं नाही. तसेच या उमेदवारीबाबत उद्धव ठाकरे यांचा आदेश हा अंतिम आदेश आहे. त्यामुळे उमेदवारी मिळत असेल तर खूप आनंद आहे त्यामुळे संधी मिळत असेल तर काम करून दाखवायचं आहे असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.