AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोट्यवधी लोकांच्या उपजिविकेचा प्रश्न, मंदिरं उघडा, शिवसेनेची मागणी

मंदिरं खुली करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत.

कोट्यवधी लोकांच्या उपजिविकेचा प्रश्न, मंदिरं उघडा, शिवसेनेची मागणी
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Aug 24, 2020 | 9:38 AM
Share

मुंबई : कोरोना संकटामुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेला धक्का बसला आहे (Shivsena Demands To Open Temples). आर्थिक चक्र पूर्वपदावर आणण्यासाठी अनलॉकच्या माध्यमातून हळूहळू व्यवसाय, उद्योगधंदे सुरु करण्यात येत आहेत. मात्र, देशातील मंदिरं अद्यापही बंदच आहेत. मंदिरं खुली करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मंदिरं खुली करण्याचं आवाहन केलं आहे (Shivsena Demands To Open Temples).

देशाची आर्थिक घडी साफ विस्कटली आहे. त्यामुळे राज्य चालविण्यासाठी आर्थिक बाबींचा विचार करावाच लागेल आणि त्यात काय चुकले? आम्ही स्वत मंदिरे, व्यायामशाळा खुल्या कराव्यात या मताचे आहोत, असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

मंदिराचेही एक अर्थकारण असतेच आणि त्यावरही असंख्य लोकांची उपजीविका अवलंबून आहे. मंदिरे ही जनतेची श्रद्धास्थळेच आहेत आणि मंदिरातील देव हे दुर्बलांना आधार देत असतात. प्रत्येकाच्या मानण्यावर ते आहे. कोट्यवधी लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न मंदिरे व इतर प्रार्थनास्थळे सोडवीत असतात. तेव्हा मंदिराचा विषयही आर्थिक उलाढालीचाच आहे, माय लॉर्ड चूकभूल द्यावी घ्यावी, असं आवाहन अग्रलेखातून करण्यात आलं आहे (Shivsena Demands To Open Temples).

एकीकडे राज्यामध्ये आर्थिक व्यवहाराचा समावेश असलेल्या प्रत्येक गोष्टीस परवानगी देण्यात आली आहे. म्हणजेच पैशांचा संबंध असेल तर धोका पत्करण्याची राज्याची तयारी आहे. मात्र मंदिरं, मशिदी उघडण्याचा धार्मिक प्रश्न येतो तेव्हा मात्र नेमकी ‘कोरोना’ची आठवण येते. हे अथिशय विचित्र आहे, असंही सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

कोरोना आहेच आणि आणखी काही काळ राहील. तरीही महाराष्ट्रात हळूहळू बऱ्याच क्षेत्रांची उघडझाप सुरुच आङे. यात न्यायालय म्हणतेय त्याप्रमाणे फक्त आर्थिक व्यवहारांचा प्रश्न उद्भवतोय असे नाही. दशाची आर्थिक घडी साफ विस्कटलेली आहे. त्यामुळे राज्या चालवण्यासाठी आर्थिक बाबींचा विचार करावाच लागेल व त्यात काय चुकले?, असा प्रश्नही सामनातून विचारण्यात आला आहे.

Shivsena Demands To Open Temples

संबंधित बातम्या :

Ganesh Visarjan | गर्दी टाळून शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन, मुख्यमंत्र्यांकडून फिरत्या कृत्रिम तलावाची पाहणी

नवी मुंबईच्या कंटेन्मेंट झोनमध्ये बाप्पाच्या विसर्जनासाठी महापालिकेची घरपोच गाडी

Follow Us
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल