Eknath Shinde: ठाण्याच्या जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदेंची शिवसेनेतून हकालपट्टी; एकनाथ शिंदेंच्या समर्थनाथ निघालेल्या मोर्चात झाल्या होत्या सहभागी

मीनाक्षी शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंड करणारे एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या व त्यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चामझध्ये सहभागी झाल्या होत्या. ठाणे शहराच्या माजी महापौर व शिवसेनेच्या जिल्हा संघटक म्हणून त्या काम केले होते.

Eknath Shinde: ठाण्याच्या जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदेंची शिवसेनेतून हकालपट्टी; एकनाथ शिंदेंच्या समर्थनाथ निघालेल्या मोर्चात झाल्या होत्या  सहभागी
ठाणे जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदेंची शिवसेनेतून हकालपट्टीImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Jun 28, 2022 | 3:00 PM

ठाणेः राज्यातील राजकीय घडामोडींना दिवसेंदिवस आता वेग येत आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला अनेक घटना बंडखोरी आमदारांमुळे (Rebel MLA) घडत आहेत. कालच्या सर्वोच्य न्यायायलयाच्या निर्णयामुळे आता शिवसेनेतील बंडखोर आमदारांना बळ मिळाले असले तरीही स्थानीक पातळीवरील राजकारणालाही आता अधिक गती मिळाली आहे. या सर्व घडामोडीमध्ये आज एक धक्कादायक घटना घडली ती म्हणजे ठाणे जिल्ह्याच्या जिल्हासंघटक मीनाक्षी शिंदे (Shivsena District Organizer Meenakshi Shinde) यांची पक्षातून हकालपट्टी (Expulsion) करण्यात आल्याचे पत्रक शिवसेनेतून काढण्यात आले आहे.

ठाणे जिल्ह्याच्या जिल्हासंघटक मीनाक्षी शिंदे यांच्यावर पक्ष विरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेऊन त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.

एकनाथ शिंदेंच्या समर्थनाथ निघालेल्या मोर्चात सहभागी

मीनाक्षी शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंड करणारे एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या व त्यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चामझध्ये सहभागी झाल्या होत्या. ठाणे शहराच्या माजी महापौर व शिवसेनेच्या जिल्हा संघटक म्हणून त्या काम केले होते.

उद्धव ठाकरे यांचा आदेश

या पत्रकामध्ये शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची हकालपट्टी केल्याचे म्हणण्यात आले आहे. तर शिवसेनेच्या मध्यमवर्ती कार्यालयातून काढण्यात आलेल्या पत्रकारवर शिववसेनेच सचित व खासदार विनायक राऊत यांची सही आहे.

पक्षाविरोधी कारवाया

शिवसेनेच्या बंडखोर 16 आमदारांवर कारवाई करण्यात आली, त्यानंतर न्यायालयाच्या निर्णयानंतर व बंडखोर आमदार मुंबईत परतण्या आधीच मीनाक्षी शिंदे यांच्यावर झालेल्या कारवाईमुले शिवसेनेच्या महिलावर्गासाठी घेतलेला हा निर्णय धक्कादायक आहे.

 ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी  शिंदे

मीनाक्षी शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेचे महापौर पद भूषविले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या या निर्णयामुळे ठाणे जिल्ह्यासह अनेकांना या निर्णयामुळे धक्का बसला आहे. मीनाक्षी शिंदे यांच्याव पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे सांगण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.