मुंबईत 20 चिमुकल्यांना डांबून ठेवलं, नेमकं कारण काय? रोहित आर्याला काय हवं होतं? मोठी माहिती समोर!

एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई येथील पवई परिसरात एका व्यक्तीने अभिनयाच्या नावाखाली १५ पेक्षा जास्त मुलांना खोलीत डांबून ठेवले आहे. त्यानंतर त्या व्यक्तीने काही मागण्या केल्या आहेत. त्या काय आहेत वाचा...

मुंबईत 20 चिमुकल्यांना डांबून ठेवलं, नेमकं कारण काय? रोहित आर्याला काय हवं होतं? मोठी माहिती समोर!
Rohit Arya
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Oct 30, 2025 | 4:45 PM

पवईमधील आर ए स्टूडियोमध्ये एका व्यक्तीने दिवसाधवळ्या १५ ते २० मुलांना डांबून ठेवले होते. अभिनयाच्या नावाखाली गेल्या सहा दिवसांपासून मुलांचे ऑडिशन सुरु होते. आज, दुपारी मुले जेवणासाठी बाहेर न आल्यामुळे ही घटना उघडकीस आली. या व्यक्तीने व्हिडीओ शेअर करत स्टुडीओमधील मुलांना ओलीस ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर घटनास्थळी पोलीस आणि NSG कमांडो पोहोचले. अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीने अखेर ओलीस ठेवणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेत मुलांची सुटका करण्यात आली. या व्यक्तीचे नाव रोहीत आर्या असे आहे.

काय आहे रोहितची मागणी?

रोहित आर्या व्हिडीओमध्ये म्हणाली की, मी आत्महत्या करण्याऐवजी मी मुलांना बंदी बनवलं आहे. मी एक प्लान बनवला आणि काही मुलांना डांबून ठेवले. माझ्या फार काही मागण्या नाहीत. खूप साध्या मागण्या आहेत. खूप मॉरल आणि एथिकल मागण्या आहेत. तसेच माझी काही प्रश्न आहेत मला काही लोकांशी बोलायचे आहे. त्यांना प्रश्न विचारायचे आणि त्याची उत्तरे देखील हवी आहेत. मला दुसरे काहीच नको. ना मी दहशतवादी आहे ना माझी पैशांची मागणी आहे. इमॉरल तर अजिबातच नाही. मला साधे सरळ संभाशण करायचे आहे ज्यासाठी मी या मुलांना ओलीस ठेवले आहे. तुमची एखाद्या छोट्या चुकीमुळे मला प्रवृत्त केले तर मी हे ठिकाण जाळून टाकेन. मी मरेन की नाही माहिती नाही पण मुलांना दुखापत नक्की होईल. त्यांना मोठ्या सदमा बसेल. त्यापलीकडे जर काही झाले तर मला सांगू नका. या सगळ्याला मला दोषी ठरवू नये. त्या लोकांना दोषी ठरवा जे उगाचच प्रवृत्त करत आहेत. एका सर्वसामान्य माणसाला केवळ बोलायचे आहे. माझे बोलणे झाल्यावर मी स्वत:च बाहेर येईन.

पुढे तो म्हणाला, अनेक प्रयत्न झाले. अनेकांना अनेक वेळा भेटून झाले. दि. 1 मे पासून साधे उपोषण करून देखील अजून आज / उद्या असेच होत आहे. आजापासून तीव्र उपोषण सुरु केले. आता पाणी सुद्धा घेणार नाही. गांभीर्य समजून घेतले तर बरे होईल असे रोहित आर्या म्हणाला.

नेमकं प्रकरण काय?

वेब सीरिजमध्ये काम देण्याच्या बहाण्याने रोहित आर्याने पवईत मुलांचे ऑडिशन घेतले. पण आज त्याने जवळपास २० मुलांना डांबून ठेवले आणि काही मागण्या केल्या. आता पोलिसांनी रोहित आर्याला ताब्यात घेतले असून मुलांना सुखरुप बाहेर काढले आहे.