मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत रात्री उशीरा बिघाड, कर्जतकडे जाणाऱ्या लोकल २० ते २५ मिनिटे उशीराने..

मध्य रेल्वेच्या उल्हासनगर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड शुक्रवारी रात्री उशीरा बिघाड झाल्याने लोकलची वाहतूक २० ते २५ मिनिटे उशीराने होत आहे.

मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत रात्री उशीरा बिघाड, कर्जतकडे जाणाऱ्या लोकल २० ते २५ मिनिटे उशीराने..
central railway late ( file photo )
| Updated on: Jul 17, 2026 | 10:21 PM

मध्य रेल्वेच्या मुख्यमार्गावरील उल्हासनगर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल ट्रेनची वाहतूक २० ते २५ मिनिटे उशीराने होत असून त्यामुळे कामावरुन घरी परतणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. उल्हासनगर आणि अंबरनाथ या स्थानकांदरम्यान लोकल ट्रेन खोळंबल्या आहेत. लोकल ट्रेनची वाहतूक कधी सुरळीत होते याकडे प्रवाशांचे डोळे लागले आहेत.

मध्य रेल्वेच्या मुख्यमार्गावरील उल्हासनगर आणि अंबरनाथ या स्थानकांदरम्यान लोकल ट्रेन गेल्या अर्ध्यातासांपासून खोळंबल्या आहेत. अनेक लोकलच्या रांगा त्यामुळे एकामागोमाग लागल्या आहेत. या संदर्भात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याचे म्हटले जात आहे. मात्र, मध्य रेल्वेने याबद्दल कोणतीही माहिती सोशल हँडल वरुन दिलेली नाही. लोकल अंबरनाथ स्थानकाच्या दिशेने हळूहळू जात आहेत, या बिघाडा संदर्भात मध्य रेल्वेने उद्घोषणा करुन नेहमी प्रमाणे प्रवाशांना माहिती देण्यात टाळाटाळ केली आहे.

एका प्रवाशाने समाजमाध्यमावर पोस्ट करीत  मुलुंड येथून कल्याणला  रात्री ८.०८ वाजता जाणारी एसी लोकल तब्बल एक तास लेट असल्याचा फोटो शेअर केला आहे. त्यावरुन या बिघाडाची कल्पना येऊ शकते. लोकल ट्रेन इतक्या उशीराने धावत आहेत की प्रवासी स्थानकांवर लोकलची वाट पाहून कातावले आहे.

येथे पाहा पोस्ट –

 

 

Follow Us