एसएनडीटी महिला विद्यापीठाने पुढील 25 वर्षांचा विकास आराखडा तयार करावा; राज्यपालांच्या सूचना

| Updated on: Jun 29, 2021 | 4:56 PM

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाने पुढील 25 वर्षांत आपले स्वरूप कसे असावे, याचा विकास आराखडा (ब्लू प्रिंट) तयार करावा, अशी सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली आहे.

एसएनडीटी महिला विद्यापीठाने पुढील 25 वर्षांचा विकास आराखडा तयार करावा; राज्यपालांच्या सूचना
Bhagat Singh Koshyari
Follow us on

मुंबई : महर्षी कर्वे यांनी दूरदृष्टीने स्थापन केलेले श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाने पुढील 25 वर्षांत आपले स्वरूप कसे असावे, याचा विकास आराखडा (ब्लू प्रिंट) तयार करून विद्यापीठाचा नावलौकिक जगात कसा वाढवता येईल यादृष्टीने विचार करावा, अशी सूचना राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी आज केली. शिक्षकांनी अध्यापन करताना मातृभाषा, भारतीय संस्कृती व नितीमूल्य याबाबत विद्यार्थ्यांमध्ये आपुलकी निर्माण करावी, अशीही सूचना त्यांनी केली. (SNDT Women’s University should prepare a development plan for the next 25 years; says Governor Koshyari)

राज्यपाल कोश्यारी यांनी आज (29 जून) एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या जुहू येथील परिसराला भेट देऊन विभागप्रमुख तसेच प्राचार्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी व प्रकुलगुरू डॉ. विष्णू मगरे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

जगात आज लिंगभेद समानतेचा (जेंडर इक्वॅलिटी) विचार होत असेल. परंतु भारताने त्याहीपुढे जाऊन स्त्रीशक्तीला श्रेष्ठत्व प्रदान केले आहे. धरणीमाता, जगन्माता जगाचे संचलन व परिपोषण करतात, हा भारताने दिलेला विचार आहे. संस्थापक महर्षी कर्वे तसेच दानशूर ठाकरसी यांच्या योगदानाचा उल्लेख करून एसएनडीटी विद्यापीठाने स्त्री उत्कर्षासाठी सातत्याने काम करावे, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांचा कार्यकाळ येत्या 2 जुलै रोजी संपत आहे, याचा उल्लेख करून राज्यपालांनी त्यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात विद्यापीठाने जुहू येथे सौरऊर्जा प्रकल्प राबवून पारंपरिक ऊर्जेची बचत केली. विद्यापीठात भारतातील पहिले महिला अध्ययन संशोधन केंद्र आहे तसेच गृहविज्ञान विषयाचे पहिले स्वायत्त महाविद्यालय असल्याचे कुलगुरू वंजारी यांनी सांगितले. निधीअभावी विद्यापीठ काही बाबतीत दुर्लक्षित राहिल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. प्र-कुलगुरू मगरे यांनी आभार प्रदर्शन केले.

इतर बातम्या

’30 वर्षात 4 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दान नको हक्क द्या’, शेतकरी नेत्यांची राज्यपालांकडे मागणी

वर्षा बंगल्यावरील घडामोडींना वेग, पवारांच्या जवळचे मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

‘महाविकास आघाडीत किती आलबेल हे त्यांच्या येरझाऱ्यांवरुनच दिसतंय’, चित्रा वाघ यांचा राऊतांना टोला

(SNDT Women’s University should prepare a development plan for the next 25 years; says Governor Koshyari)