Somaiya on Thackeray | ठाकरे परिवाराचं हे पहिलंच मनी लॉन्ड्रिंगचं काम की…सोमय्यांचा तिखट सवाल

| Updated on: Mar 23, 2022 | 10:43 AM

भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, नंदकिशोर हा हवाला ऑपरेटर आहे. त्याच्याकडे ठाकरेंनी कंपनी का दिली, ठाकरे परिवाराचे त्यांच्याशी संबंध काय, हे ठाकरे परिवाराचं हे पहिलंच मनी लॉन्ड्रिंगचं काम आहे की, या आधीही केलीयत असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Somaiya on Thackeray | ठाकरे परिवाराचं हे पहिलंच मनी लॉन्ड्रिंगचं काम की...सोमय्यांचा तिखट सवाल
किरीट सोमय्या.
Follow us on

मुंबईः ठाकरे परिवाराचं हे पहिलंच मनी लॉन्ड्रिंगचं काम आहे की, या आधीही अशी कामं केलीयत, असा तिखट सवाल बुधवारी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी करत शिवसेनेवर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय. ते मुंबईत बोलत होते. ईडी अर्थातच अंमलबजावणी संचलनालयाने (Enforcement Directorate) मंगळवारी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मेहुण्यावर कारवाई केली. उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्या ठाण्यातील 11 सदनिका जप्त केल्या. या मालमत्तांची किंमत 6 कोटी 45 लाख रुपये असल्याचे ईडीने सांगितले. ईडीने पुष्पक ग्रुपच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या मेसर्स पुष्पक बुलियनशी संबंधित स्थावर मालमत्ता जप्त केलीय. यात साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील सदनिकांचा समावेश आहे. ईडीच्या या कारवाईनंतर आता भाजप विरुद्ध शिवेसना असा कलगीतुरा पुन्हा एकदा रंगलाय.

रात्रीची झोप उडणार

सोमय्या म्हणाले की, श्रीधर पाटणकर आणि त्यांचे कारनामे यावर गेले तीन वर्ष मी पाठपुरावा करतोय. कोट्यवधींच्या मालमत्तेत 30 कोटींचा गैरव्यवहार झाला आहे. कोट्यवधी रुपये आणि सगळ्या गोष्टी बाहेर आल्या तर उद्धव ठाकरेंची रात्रीची झोप उडणार आहे. कालच्या प्रकरणात एक पाऊल पुढे जायचे, तर नंदकिशोर चतुर्वेदी आणि उद्धव ठाकरेंचे संबंध काय? उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईकचे संबंध काय, अशा सवालाच्या फैरी सोमय्यांनी झाडल्या.

तुम्ही माहिती देणार की, मी देऊ…

सोमय्या म्हणाले की, मी म्हटलं की जमीन व्यवहार आहेत. मात्र, उद्धव ठाकरे आणि हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीचे संबंध काय? श्रीधर पाटणकर आणि रश्मी ठाकरे, श्रीधर पाटणकर आणि आदित्य ठाकरे यांच्या आर्थिक व्यवहारांबाबत ठाकरे बोलणार का, ज्या-ज्या शेअर कंपन्यांमधून पैसे घेतले, मनी लॉन्ड्रिंग केले, त्याची माहिती तुम्ही देणार, की मला द्यावी लागणार, अशी थेट विचारणा त्यांनी केली.

हवाला ऑपटेरशी संबंध काय?

सोमय्या म्हणाले, नीलांबरी प्रोजेक्ट ठाणे, श्री साईबाबा, श्रीधर पाटणकर उर्फ ठाकरेंचे मेव्हणे, पुष्पक बुलियन, महेश पटेल, चंद्रकांत पटेल, हवाला ऑपरेटर हमसफर डिलर यांचे संबध काय आहेत. आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी 2014 मध्ये जी कंपनी बनवली त्यात आदित्य ठाकरे मालकपण आहेत. नंदकिशोर हा हवाला ऑपरेटर आहे. त्याच्याकडे ठाकरेंनी कंपनी का दिली, ठाकरे परिवाराचे त्यांच्याशी संबंध काय, हे ठाकरे परिवाराचं हे पहिलंच मनी लॉन्ड्रिंगचं काम आहे की, या आधीही केलीयत असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

इतर बातम्याः

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

tv9 Explainer : आप कौन है, भर विधानसभेत नितीशकुमारांनी सभापतींना झापलं, भाजपला झटका देण्याच्या तयारीत?