‘ही जागा पबजी खेळण्यासाठी राखीव आहे’, बदलापुरातील तरुणांचा खोडसाळपणा

| Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM

मुंबई : एखादी जागा उद्यान किंवा एखाद्या सरकारी कार्यालयासाठी राखीव असल्याचं फलक आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. मात्र, ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे चक्क ‘पबजी गेम’ खेळण्यासाठी एक जागा राखीव असल्याचं समोर आलं आहे. याबाबत पोलीस आयुक्तांकडे तक्रारही करण्यात आली आहे. ‘ही जागा पबजी खेळण्यासाठी राखीव आहे. हुकुमावरून, ओन्ली पबजी फायटर्स’, अशा आशयाचं एक फलक बदलापूरच्या […]

‘ही जागा पबजी खेळण्यासाठी राखीव आहे’, बदलापुरातील तरुणांचा खोडसाळपणा
Follow us on

मुंबई : एखादी जागा उद्यान किंवा एखाद्या सरकारी कार्यालयासाठी राखीव असल्याचं फलक आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. मात्र, ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे चक्क ‘पबजी गेम’ खेळण्यासाठी एक जागा राखीव असल्याचं समोर आलं आहे. याबाबत पोलीस आयुक्तांकडे तक्रारही करण्यात आली आहे.

‘ही जागा पबजी खेळण्यासाठी राखीव आहे. हुकुमावरून, ओन्ली पबजी फायटर्स’, अशा आशयाचं एक फलक बदलापूरच्या कात्रप भागातील आंबेडकर चौकात एका झाडावर लावण्यात आलं होतं. याबाबत एका वृद्ध व्यक्तीने पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. ट्विटरद्वारे त्यांनी ही तक्रार केली.

कात्रप परिसरातील कॉलेजचे विद्यार्थी याच झाडाखाली दररोज पबजी खेळण्यासाठी एकत्र जमतात. खोडसाळपणा म्हणून त्यांनी ही जागा पबजी खेळण्यासाठी राखीव असल्याचं फलक इथे लावलं. मात्र, ही बाब इथे राहणाऱ्या एका 68 वर्षीय वृद्धांना काही पटली नाही. त्यामुळे त्यांनी याबाबत ट्विटरवर पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. त्यांनी केलेल्या या ट्विटची दखल घेत पोलीस आयुक्तांनी स्थानिक पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आणि हा फलक तातडीने हटवण्यात आला.

सध्या तरुणाईला पबजी या ऑनलाईन हिंसक खेळाचं वेड लागलं आहे. या खेळाच्या नादात अनेकांनी आपला जीव गमावला, तर अनेकांनी या खेळासाठी आपलं घरही सोडलं. त्यामुळे या खेळावर बंदी आणण्यासाठी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. तर गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये या खेळावर बंदी घालण्यात आली आहे. देशातच नाही तर जगभरातील तरुण या खेळाच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे अनेक देशांनी या खेळावर बंदी घातली आहे. तर, दिवसभरात 6 तास पबजी खेळण्याची मर्यादाही घालण्यात आली आहे. मात्र, या खेळाने तरुणांना या पद्धतीने आपल्या चक्रव्यूहात फसवलं आहे, की त्यातून बाहेर येणं हे खूप कठिण झालं आहे. त्यामुळे आता पालकांनी आपल्या मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. तसेच, त्यांना या खेळाच्या विळख्यातून सोडवण्याचा प्रयत्न करायला हवा.