फाल्गुनी पाठकच्या गरब्यात अमृता फडणवीस यांचा ताल

| Updated on: Oct 08, 2019 | 9:45 AM

मुंबईतील बोरिवली भागात दरवर्षी नवरात्रीचे नऊ दिवस फाल्गुनी पाठक यांचा गरबा आयोजित केला जातो. नवरात्राच्या शेवटच्या रात्री अर्थात नवमीला अमृता फडणवीस यांनी मुलगी दिवीजासोबत गरब्याला उपस्थिती लावली.

फाल्गुनी पाठकच्या गरब्यात अमृता फडणवीस यांचा ताल
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राच्या मिसेस मुख्यमंत्री अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी फाल्गुनी पाठकच्या गरब्याला हजेरी (Amruta Fadanvis at Falguni Pathak Garba) लावली होती. यावेळी अमृता फडणवीसांनी एकामागून एक गाणी सादर करत उपस्थितांना ठेका धरायला लावला.

मुंबईतील बोरिवली भागात दरवर्षी नवरात्रीचे नऊ दिवस फाल्गुनी पाठक यांचा गरबा आयोजित केला जातो. नवरात्राच्या शेवटच्या रात्री अर्थात नवमीला अमृता फडणवीस यांनी मुलगी दिवीजासोबत गरब्याला उपस्थिती लावली. मिसेस मुख्यमंत्र्यांनी सादर केलेल्या ‘दमा दम मस्त कलंदर’ या गाण्यावर उपस्थितांनी ताल धरला.

मंचावर उपस्थित फाल्गुनी पाठक यांनाही अमृता फडणवीसांच्या सूरात सूर मिसळत गाण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी ‘दमा दम…’ गाणं मिसेस मुख्यमंत्र्यांच्या सोबतीने (Amruta Fadanvis at Falguni Pathak Garba) सादर केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांची कन्याही ताल धरत साथ देत होती.

अमृता फडणवीस यांनी विजयादशमीच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या. ‘दसरा म्हणजे वाईटपणावर चांगुलपणाने केलेली मात. देवी माता सर्वांना सुबुद्धी दे आणि सुदृढ दीर्घायुष्य लाभू दे’ अशी प्रार्थना केल्याचं अमृता फडणवीस यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना सांगितलं.

Viral वास्तव : अमृता फडणवीसांनी गायलं मनसेचं प्रचारगीत?

सरकार असू दे किंवा पर्यावरणप्रेमी, दोघंही आपापल्या परीने विचार करत आहेत. सरकार जनतेचं जीवन सुकर कसं होईल, या दृष्टीने विचार करत आहे. मला वाहतूक कोंडीमुळे वरळीहून बोरीवलीला यायला अडीच तास वेळ लागला, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

पर्यावरणप्रेमींना वाटतं की वृक्षतोड केली तर प्रदूषण वाढेल. दोघांचे विचार आपापल्या पद्धतीने योग्यच आहेत. मात्र सरकारने प्रत्येक बाजूने विचार केला आहे. एखादा पर्याय निघाला, तर उत्तम मात्र मेट्रो झाली नाही, तर वाहतुकीची समस्या आणखी बिकट होईल, अशी भीतीही अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली.

आरेमध्ये वृक्षतोड

सुप्रीम कोर्टाने आरे जंगलातील झाडे कापण्याला स्थगिती दिली. यानंतर कोर्टाच्या निर्णयाचा आदर असल्याचं स्पष्टीकरण मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन म्हणजेच एमएमआरसीने दिलंय. दरम्यान, जी 2185 झाडं कापली जाणार होती, त्यापैकी 2141 झाडं अगोदरच कापण्यात आली आहेत. भविष्यात एकही झाड कापलं जाणार नसल्याची ग्वाही एमएमआरसीने दिली. पण या ठिकाणी साफसफाई आणि कापलेली झाडं हटवण्याचं काम सुरु राहणार आहे.