AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral वास्तव : अमृता फडणवीसांनी गायलं मनसेचं प्रचारगीत?

अमृता फडणवीस मनसेचा प्रचार करत असल्याचा व्हिडीओ फेक असून मूळ व्हिडीओशी छेडछाड करुन तयार करण्यात आल्याचं उघड झालं आहे. अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांसाठी आयोजित चॅरिटी कार्यक्रम 'उमंग 2018' मध्ये 'फिर से' या गायलेल्या गाण्याच्या व्हिडीओला एडिट करुन त्यामध्ये बॅकग्राऊण्डला मनसेच्या गाण्याचा ऑडिओ टाकण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.

Viral वास्तव : अमृता फडणवीसांनी गायलं मनसेचं प्रचारगीत?
| Updated on: Sep 26, 2019 | 10:59 AM
Share

मुंबई : मिसेस मुख्यमंत्री अर्थात अमृता फडणवीस यांनी मनसेचा प्रचार केल्याच्या अफवा सध्या सोशल मीडियावर वायरल झाल्या आहेत. एका कार्यक्रमात अमृता फडणवीस मनसेचं प्रचारगीत असल्याचा खोटा व्हिडीओ (Amruta Fadanvis Viral Vastav) वायरल करण्यात आला आहे. मात्र ‘फॅक्ट चेक’ केले असता हा व्हिडीओ मूळ चित्रफीतीशी छेडछाड करुन बनवल्याचं समोर आलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना पार्श्वगायनात रस असल्याची कल्पना सर्वांनाच आहे. त्यांनी फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपला ठसा उमटवला आहे. मिसेस मुख्यमंत्र्यांचे काही म्युझिक व्हिडीओही रिलीज झाले आहेत. अमृता फडणवीसांच्या आवाजावर रसिक प्रेक्षकांच्या पसंतीची मोहोर उमटली आहे.

अशातच, अमृता फडणवीस मनसेच्या प्रचारासाठी गाणं गात असल्याचा व्हिडिओ (Amruta Fadanvis Viral Vastav) सोशल मीडियावर वायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. भाजपवर घणाघात करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा प्रचार अमृता फडणवीस कसा करु शकतात, असा प्रश्नही अनेकांच्या मनात आला. अखेर या व्हिडीओची सत्यता ‘फॅक्ट क्रेसेंडो मराठी’ या फेसबुक पेजने पडताळून पाहिली.

काय आहे मनसेचं प्रचारगीत?

घेऊन मनसेचा झेंडा हाती… बाई आला गं मनसेचा सेनापती

अमृता फडणवीसांच्या वायरल व्हिडीओमागील सत्य

संबंधित व्हिडीओ फेक असून मूळ व्हिडीओशी छेडछाड करुन तयार करण्यात आल्याचं उघड झालं आहे. अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांसाठी आयोजित चॅरिटी कार्यक्रम ‘उमंग 2018’ मध्ये ‘फिर से’ हे गाणं सादर केलं होतं. या परफॉर्मन्सच्या व्हिडीओला एडिट करुन त्यामध्ये बॅकग्राऊण्डला मनसेच्या गाण्याचा ऑडिओ टाकण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची कन्याही उपस्थित होते.

अमृता फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या प्रचारासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याने याचा भाजपला फायदा होईल, असं म्हटलं जात आहे. अमृता फडणवीस मुख्यमंत्र्यांशिवाय इतरही उमेदवारांच्या प्रचाराला जाणार असल्याचं त्यांनीच पूर्वी सांगितलं होतं. यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या स्टार प्रचारकांच्या लिस्टमध्ये आता अमृता फडणवीस यांच्या नावाचाही समावेश केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आगामी निवडणुकीत ‘मिसेस मुख्यमंत्री’ प्रचाराच्या रिंगणात

काही महिन्यांपूर्वी अमृता फडणवीस यांचा अमेरिकेत रॉक लूक समोर आला होता. अमृता फडणवीस यांनी अमेरिकेतील एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये सहभाग नोंदवला होता. या शोचं आयोजन अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिशिअन्स ऑफ इंडियन ओरिजिन यांनी केलं होतं. अमृता फडणवीस यांच्या परफॉर्मन्सला प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळाली.

मिसेस मुख्यमंत्री आधीही ट्रोल

अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, त्यांचा उल्लेख राष्ट्रपिता (Father of our Country) असा केला होता. त्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. राष्ट्रपिता म्हणून देश केवळ महात्मा गांधी यांचाच उल्लेख करतो पण अमृता फडणवीस यांनी थेट मोदींचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केल्याने त्यांच्यावर टीका झाली होती.

अमृता फडणवीस यापूर्वी त्यांच्या सेल्फीमुळे वादात अडकल्या होत्या. मुंबई ते गोवा या जलमार्गावरील ‘आंग्रीया’ क्रूझच्या डेकवर टोकाला जाऊन सेल्फी काढला होता. सुरक्षारक्षकांना डावलून त्यांनी सेल्फी घेतल्याने त्यांच्यावर टीका झाली होती.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.