मुंबई : शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. पुणे ते मुंबई महामार्गावर कार अपघात झाला. गाडी चालविताना कारचालक सावध असले पाहिजे. तर अपघात टाळता येऊ शकतात. या अनुषंगाने विधिमंडळातील सर्व सदस्यांच्या चालकांसाठी परिवहन विभागानं काल एक कार्यशाळा घेतली. यशवंतराव चव्हाण सेंटर (Yashwantrao Chavan Centre) येथे ही कार्यशाळा घेण्यात आली. विधानसभेचे 288 आणि विधान परिषदेचे 78 आमदार यांचे चालक या प्रशिक्षण कार्यशाळेत ( workshop for drivers) उपस्थित राहणे अपेक्षित होते. परंतु, 150 वाहन चालक या प्रशिक्षणात उपस्थित होते. ही कार्यशाळा घेऊन परिवहन विभाग आता सावध झाल्याचं दिसून आलं.