मुंबई विमानतळावर स्पाईस जेटच्या विमानाचे इमर्जन्सी लँडींग, सर्व प्रवासी सुखरुप

स्पाईस जेटच्या एका विमानाचे मुंबईच्या विमानतळावर सुखरुप लँडींग करण्यात आले आहे.या विमानातील सर्व प्रवासी सुखरुप असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई विमानतळावर स्पाईस जेटच्या विमानाचे इमर्जन्सी लँडींग, सर्व प्रवासी सुखरुप
| Updated on: Sep 12, 2025 | 6:09 PM

मुंबई विमानतळावर स्पाईस जेटच्या विमानाचे इमर्जन्सी लँडीग करण्यात आले आहे. या विमानाचे चाक हवेतच निखळल्याने या विमानाचे मुंबई विमानतळावर सुखरुप लँडींग करण्यात आले. या विमानातील ७५ प्रवासी सुखरुप असून त्यांना विमानतळावर उतरवण्यात यश आले आहे. स्पाईस जेटचे विमान कांडला ते मुंबई असे प्रवास करत असताना हा प्रकार घडला आहे.

स्पाईस जेटचे flight क्रमांक  SG 2906 हे  विमान कांडला ते मुंबई येत होते तेव्हा एक चाक हवेत निखळून पडल्याचे लक्षात आले. त्यामुळे मुंबई विमानतळावर सर्व यंत्रणांना अलर्ट करण्यात आले त्यानंतर मुंबईतील इतर सर्व विमानांचे ऑपरेशन थांबवण्यात आले. आणि विमानतळावर या विमानाच्या इमर्जन्सी लँडींगसाठी सर्व तयारी करण्यात आली. त्यानंतर हे विमान मुंबई विमानतळाच्या रनवेवर सुखरुप उतरवण्यात आले. या घटनेत कोणीही जखमी झालेले नसून सर्व प्रवासी सुखरुप असल्याचे एअर पोर्ट अथोरिटीने सांगितले आहे.

येथे पोस्ट पाहा –

मुंबई विमानतळावर स्पाईस जेटचे हे विमान अगदी सुखरुपपणे लँड झाल्याचे एअरपोर्ट अथोरिटीने सांगितले आहे. या विमानातील सर्व ७५ प्रवासी सुखरुप असल्याचे ही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या विमानाचे लँडींग गिअरचे एक चाक हवेत निखळल्याचे म्हटले जात आहे. या संदर्भात वेळीच लक्षात आल्याने मोठी हानी टळली असल्याचे म्हटले जात आहे.

अहमदाबाद अपघात

अलिकडे अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात झाला होता. त्यात २६० हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. अहमदाबाद विमानतळावरुन विमानाने उड्डाण घेताच अवघ्या काही सेकंदात हे विमान खाली कोसळले होते. या घटनेत हे विमान हे हॉस्टेलवर कोसळल्याने आणखी हानी झाली होती.