मोठी बातमी: इंधन दरवाढीमुळे एसटीचा प्रवास महागणार

| Updated on: Oct 23, 2021 | 10:03 AM

एसटीला आतापर्यंत 12500 कोटी रुपयांचा संचित तोटा झाला आहे. याशिवाय कोट्यवधांची देणी शिल्लक आहेत. डिझेल दरात सातत्याने वाढ होत असल्याने खर्चात वाढ झाली आहे. कोरोना काळात प्रवासी संख्या घटल्याने उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे 12 तास काम करूनही कर्मचाऱ्यांचे वेतन अनेकदा रखडले आहे.

मोठी बातमी: इंधन दरवाढीमुळे एसटीचा प्रवास महागणार
एसटी
Follow us on

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) तिकीटांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. इंधन दरवाढीमुळे एसटीला प्रचंड तोटा होत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी एसटीच्या तिकीटाचे दर 17 टक्क्यांनी वाढवण्याचा प्रस्वात महामंडळाने राज्य सरकारकडे पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आधीच पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे चटके सहन करणाऱ्या सर्वसामान्यांच्या संकटात आणखी भर पडणार असल्याची शक्यता आहे.

भाडेवाढीसाठी राज्याचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय परिवहन समिती तयार करण्यात आली आहे. समितीचा अहवाल महामंडळाच्या संचालक मंडळासमोर सादर करण्यात येईल.

एसटीला आतापर्यंत 12500 कोटी रुपयांचा संचित तोटा झाला आहे. याशिवाय कोट्यवधांची देणी शिल्लक आहेत. डिझेल दरात सातत्याने वाढ होत असल्याने खर्चात वाढ झाली आहे. कोरोना काळात प्रवासी संख्या घटल्याने उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे 12 तास काम करूनही कर्मचाऱ्यांचे वेतन अनेकदा रखडले आहे.

हकीम समितीच्या शिफारशीनुसार महागाईच्या आधारावर भाडेवाढ होत असल्याने, डिझेलचे दर दहा टक्क्यांहून अधिक वाढल्यास, टायरचे दर, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि सुटे भागांच्या दरातील वाढीच्या निकषांचा अभ्यास केला जातो. जून 2018 मध्ये करण्यात आलेली शेवटची भाडेवाढ ज्या निकषांवर करण्यात आली. त्याचाही अभ्यास केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरुच

गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुरु असलेल्या खनिज तेलाच्या दरवाढीला अखेर ब्रेक लागला आहे. रॉयटर्सच्या माहितीनुसार, कोळसा आणि नैसर्गिक वायूच्या दरातही घसरण नोंदवण्यात आली आहे. खनिज तेलाचा दर प्रतिबॅरल 86 डॉलर्सपर्यंत पोहोचला होता. तो आता 85 डॉलर्सच्या खाली आला आहे. त्यामुळे भारतात इंधन स्वस्त होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून शनिवारी सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 30 ते 35 पैशांची वाढ झाली आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील.

पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 30 पैशांनी वाढून 113.08 रुपये इतका आहे. तर डिझेलच्या दरात 34 पैशांची वाढ झाल्यामुळे एका लीटरसाठी 103.97 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 107.24 आणि 95.98 रुपये इतका आहे. इंधनाची दरवाढ अशीच सुरु राहिल्यास पेट्रोल लवकरच 120 रुपये प्रतिलीटरचा टप्पा गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

संबंधित बातम्या:

Petrol Diesel price: मोदी सरकार नागरिकांना दिवाळी गिफ्ट देणार, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट होणार?

कच्च्या तेलाचे दर तीन वर्षांतील उच्चांकी पातळीवर, भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ अटळ?

दसरा-दिवाळीपर्यंत ‘ही’ गोष्टही महागण्याची शक्यता; पेट्रोल, डिझेलनंतर ‘कॉमन मॅन’ला आणखी एक झटका

खनिज तेलाचा दर घसरल्यानंतही भारतात पेट्रोल-डिझेल अजूनही महाग का?