गृहिणींचं बजेट कोलमडलं, सणासुदीच्या काळात खाद्यतेलाचे भाव कडाडले

तेलाच्या दरात आणखी भाव वाढ होण्याची शक्यता तेल विकणाऱ्या कंपन्या आणि व्यापाऱ्यांकडून दर्शवली जात आहे.

गृहिणींचं बजेट कोलमडलं, सणासुदीच्या काळात खाद्यतेलाचे भाव कडाडले
| Updated on: Oct 24, 2020 | 1:06 AM

नवी मुंबई : कोरोना महामारी आणि महागाईचे संकट असतानाच तोंडावर आलेल्या (Cooking Oil Price Hike) दसरा दिवाळीची चिंता सर्वसमान्यांना लागली आहे. सणासुदीच्या दिवसांत तेल दर वाढीचा मोठा फटका सर्वसमान्यांना बसणार आहे. आधीच कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. हातावर पोट असणाऱ्यांची यंदा दिवाळीही अंधारातच जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सणासुदीच्यावेळी हातात पैसे नाहीत, त्यात भर म्हणून वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे (Cooking Oil Price Hike).

स्वयंपाकासाठी तेलाची गरज असते. त्यामुळे तेलाची खरेदी ही करावीच लागते. तेलाच्या किंमती वाढल्याने गृहिणींचं बजेट कोलमडून पडलं आहे. सोयाबीन, पाम तेल आणि सूर्यफुल तेल अशा खाद्यतेलांचे भाव वाढले असून शेंगदाणा तेलाच्या दरात घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजार, नैसर्गिक आपत्ती, वाढीव कस्टम ड्युटी आणि तेलाचा कृत्रिमसाठा अशा वेगवेगळ्या कारणांमुळे तेलाच्या दरात वाढ झाल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये यंदाच्या वर्षी पामतेल जास्त प्रमाणात बाजारात उपलब्ध होणार नाही. असा अंदाज वर्तवला जात आहे. इतर खाद्यतेलाच्या भावात देखील मागील आठवड्यात तेलाच्या दरात 10 ते 15 रुपयांची वाढ झाली आहे. तसेच, तेलाच्या दरात आणखी भाव वाढ होण्याची शक्यता तेल विकणाऱ्या कंपन्या आणि व्यापाऱ्यांकडून दर्शवली जात आहे.

दरवर्षी सोयाबिनच्या तेलाची आवक ही सप्टेंबरमध्ये होते. मात्र, यावर्षी पारतीच्या पावसाने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आवक होऊ शकली नाही. काही व्यापाऱ्यांच्या मते तेलाचे भाव वाढणार असल्याचे संकेत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कृत्रिम साठा केल्याचाही परिणाम तेलाच्या दरावर झाला आहे. तर नेमके सध्याच्या परिस्थितीत खाद्यतेलाची बाजारात काय भाव आहेत, जाणून घेऊ…

सूर्यफूल तेलाचा (sunflower oil) आधीच बाजार भाव 15 लिटरच्या डब्यामागे 1500 रुपये इतका होता. तर सध्याचा भाव हा 1700 ते 1800 रुपये इतका आहे. पाम तेलाचा आधीच बाजार भाव हा 1000 ते 1100 रुपये एवढा होता. तर सध्याचा भाव हा 300 रुपयांनी वाढला असून पाम तेल हे 1400 ते 1500 रुपये इतके झाले आहे. मात्र, शेंदणा तेलाच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. शेंदणा तेलाचा आधीच बाजार भाव हा 2400 रुपये इतका होता. मात्र, सध्याचा भाव हा 2100 रुपये इतका झाला आहे

Cooking Oil Price Hike

संबंधित बातम्या :

APMC च्या फळ मार्केटमध्ये स्पेनचा हापूस, 10 आंब्यांची किंमत 4,500 रुपये