शेतकऱ्यांना पैसे नको; न्याय हवा आहे; सुप्रिया सुळे यांचा भाजपला टोला

| Updated on: Dec 25, 2020 | 1:08 PM

शेतकरी आंदोलनाला आज 30 दिवस पूर्ण झाले तरी शेतकऱ्यांचं म्हणणं केंद्र सरकार ऐकून घेत नसल्याने राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. (supriya sule reaction on central government PM-Kisan Instalment scheme)

शेतकऱ्यांना पैसे नको; न्याय हवा आहे; सुप्रिया सुळे यांचा भाजपला टोला
Supriya Sule
Follow us on

मुंबई: शेतकरी आंदोलनाला आज 30 दिवस पूर्ण झाले तरी शेतकऱ्यांचं म्हणणं केंद्र सरकार ऐकून घेत नसल्याने राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. हे सरकार शेतकऱ्यांचा मान करत नाही. सर्व काही पैशाने विकत घेता येत नाही. शेतकऱ्यांना पैसे नकोत. न्याय हवा आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. (supriya sule reaction on central government PM-Kisan Instalment scheme)

खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी खास बातचीत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले. त्यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं. केंद्रातील सरकार असंवेदनशील आहे. गरीब शेतकऱ्यांचा हे सरकार सन्मान करत नाही. शेतकऱ्यांवर अन्यायच करत आहे. जे धोरण सरकारने आणलं आहे. त्यावर योग्य चर्चा करण्याची गरज आहे, असं सांगतानाच देशात अस्वस्थता वाढत आहे. शेतकरीही अस्वस्थ आहेत. त्यांना पैसे नको आहेत. त्यांना न्याय हवा आहे. सर्व काही पैशाने विकत घेता येत नाही. माणसाचा स्वाभिमान तर नाहीच नाही, असं सुप्रिया म्हणाल्या.

यावेळी सुप्रिया सुळे यांनी लालबाग येथील इंडिया युनायटेड मिल नंबर-5 मधील कर्मचाऱ्यांची भेट घेतली. लॉकडाऊन काळापासून मिल बंद आहे. त्यामुळे कामगारांना काम मिळत नाही. पगार मिळत नाही. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी कामगारांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे मांडल्या. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्याशी या विषयावर चर्चा करून प्रश्न मार्गी लावणार असल्याचं आश्वासन दिलं. (supriya sule reaction on central government PM-Kisan Instalment scheme)

 

संबंधित बातम्या:

PM Modi LIVE : केसीसी कार्ड न मिळाल्यास ते प्राप्त करा आणि त्याचा उपयोग करा, मोदींचं शेतकऱ्यांना आवाहन

PM Kisan Scheme : 12 वाजता तुमच्या खात्यात पैसे पडणार, पंतप्रधान मोदींच्या भाषणाकडे लक्ष

Live : केंद्राने आणलेले कृषी कायदे शेतकऱ्यांना संरक्षण देणारे : देवेंद्र फडणवीस

(supriya sule reaction on central government PM-Kisan Instalment scheme)