मुंबईतील चहाप्रेमींचे तोंड पोळणार; चहा आणि कॉफी इतक्या रुपयांनी महागणार, टी अँड कॉफी असोसिएशनचा निर्णय

| Updated on: Mar 18, 2022 | 9:31 AM

मुंबईतील (Mumbai) टी अँड कॉफी असोशिएशनने (Tea and coffee Association) दूध आणि साखरेचे दर वाढल्याने चहा आणि कॉफीच्या दरात वाढ करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मुबईकरांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे.

मुंबईतील चहाप्रेमींचे तोंड पोळणार; चहा आणि कॉफी इतक्या रुपयांनी महागणार, टी अँड कॉफी असोसिएशनचा निर्णय
Tea Coffiee Hike
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबईः सध्या सर्वसामान्यांना महागाईचा फटका सगळ्याच गोष्टींसाठी बसत आहे. कधी पेट्रोल महाग तर कधी गॅस सिलिंडर महाग जीवनोपयोग वस्तू महागाल्याने सर्वसामान्य नागरिक हवालदिल आहे. त्यातच आता मुंबईतील (Mumbai) टी अँड कॉफी असोशिएशनने (Tea and coffee Association) दूध आणि साखरेचे दर वाढल्याने चहा आणि कॉफीच्या दरात वाढ करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मुबईकरांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. नुकताच हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीकडूनही चहा, कॉफी आणि दूधाची पावडर (Milk Powder) या त्यांच्या उत्पादनाच्या किंमतीमध्ये वाढ केल्याने त्यांच्या ग्राहकांमधून नाराजी व्यक्त केली जात असतानाच मुंबईकरानाही आता चहा आणि कॉफीसाठी जादा पैसे द्यावे लागणार आहेत.

कोरोनाचे संकट कमी होते न होते तेच रशिया आणि युक्रेन युद्धामुळे आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. या वस्तूंबरोबरच जीवनोपयोगी वस्तूंच्या किंमतीही प्रचंड वाढल्या आहेत. त्याच बरोबर सर्वसामान्यांच्या रोजच्या वापरातील दूध आणि साखरेचे दर वाढल्याने त्यांच्या खिशाला आधीच कात्री लागली आहे. दूध, साखरेचे दर वाढल्यामुळे आता मुंबईतील टी अँन्ड काफी असोसिएशनने चहा आणि कॉफी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

चहाची किंमत होणार…

या असोसिएनने चहा, कॉफीत दर वाढ केली तर चहा, कॉफी दोन दोन रुपयांनी महागणार आहे. त्याचा फटका मुंबईतील अनेक सर्वसामान्य आणि चहाप्रेमींना बसणार आहे. अनेक ठिकाणी दहा रुपयांना मिळणारा चहा आता बारा रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे चहाप्रेमींच्या खिशाला कात्री लागणार आहे.

का वाढला दर

दूध उत्पादक महासंघ, आणि दूध कंपन्यांकडून दुधाच्या दरात वाढ केली आहे. दूध उत्पादक संघांना प्रति लिटर दुधामागे दोन रुपयांची वाढ केली असून वीज आणि चारा यांचा खर्च वाढल्यामुळे ही वाढ केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. राज्यातील महानंदा, चितळे, गोवर्धन, कात्रज, अमूल आणि मदर डेअरी यांच्या दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

कॉफी लागणार कडू

चहाच्या किंमती वाढवण्या पाठीमागे दूध, साखर आणि चहा पावडर यांच्या वाढलेल्या किंमतींमुळे ही वाढ करण्यात आली आहे. चहा बरोबरच कॉफीच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली असून ब्रू गोल्ड कॉफीच्या किंमतीमध्ये तीन ते चार टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. तसेच नेस्ले इंडियाच्या एक लिटर दूधाची किंमत चार टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. कॉफीचे 78 आणि 100 रुपयांमध्ये मिळणारी पाकिट आता महागली आहेत.

संबंधित बातम्या

नवाब मलिक बिन खात्याचे मंत्री राहणार, पालकमंत्रीपदाची जबाबदारीही दुसऱ्याकडे!

आम्ही अभिनंदन केलं, तुम्ही काम कधी करणार? मनसेचा उलट्या बॅनरसह शिवसेनेला सवाल

Healthy Poha Recipes : पोहेंचा वापर करून बनवा हे चमचमीत अन् स्वादिष्ट पदार्थ, एकदा खाल तर वारंवार मागाल!!