आम्ही अभिनंदन केलं, तुम्ही काम कधी करणार? मनसेचा उलट्या बॅनरसह शिवसेनेला सवाल

आम्ही अभिनंदन केलं, तुम्ही काम कधी करणार? मनसेचा उलट्या बॅनरसह शिवसेनेला सवाल
मनसेच्या हटके बॅनरची चर्चा
Image Credit source: twitter

ट्वीट करुन मनसे आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेवर (Shivsena) खोचक टिका केली आहे. या उलट्या बॅनरची सध्या जोरदार चर्चा आहे. विकासकामांवरून त्यांनी शिवसेनेला टार्गेट केले आहे.

अमजद खान

| Edited By: दादासाहेब कारंडे

Mar 17, 2022 | 11:09 PM

कल्याण : कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील (Mns Mla Raju Patil)  यांनी शिवसेनेचे अभिनंदन करणारा उलटा बॅनर ट्विट (Mns Banner) केला आहे. हे ट्वीट करुन मनसे आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेवर (Shivsena) खोचक टिका केली आहे. या उलट्या बॅनरची सध्या जोरदार चर्चा आहे. डोंबिवलीतील निवासी भागातील रस्ते सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे करण्यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी 36 कोटी रुपये मंजूर केले असल्याचा बॅनर शिवसेनेकडून लावण्यात आला होता. काम प्रत्यक्षात सुरु झाले नसल्याने मनसेकडून त्यावर टिका करणारी बॅनरबाजी करण्यात आली होती. काम सुरु करा असा आग्रह मनसेने धरला होता. काम सुरु नसताना बॅनरबाजी काय करता असा सवाल उपस्थित केला होता. 17 फेब्रुवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पालकमंत्र्यांच्या हस्ते रस्ते कामाचा शुभारंभ झाला होता. यावेळी व्यासपीठावर मनसे आमदारही उपस्थीत होते. त्यावेळी पालकमंत्र्यांनी आत्ता मनसे आमदारांनी काम सुरु झाल्यावर अभिनंदनाचा बॅनर लावावा असा चिमटा काढला होता. त्यावर मनसे आमदारांनी अभिनंदनाचा बॅनर नक्की लावणार असे स्पष्ट केल होते. त्यावरूच हे बॅनरयुद्ध सुरू झालंय.

मनसेच्या बॅनरची चर्चा

प्रत्यक्षात कामाला सुरूवात नाही

प्रत्यक्षात अजून कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे शिवसेनेच्या अभिनंदनाचा उलटा बॅनर आता मनसेने ट्विट केला आहे. यासंदर्भात आमदार पाटील यांनी सांगितले की, एमआयडीसीतील रस्ते कॉन्क्रीटीकरणाचा शुभारंभ आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला होता. आधी कामे चालू करा. लोकांना त्रस होतोय. मी अभिनंदनाचे बॅनर तयार करुन ठेवले आहे. आम्ही विरोधक आहोत. सत्ताधाऱ्यांकडून काम कसे करुन घ्यायचे. ही आमची जबाबदारी आहे. उलटा बॅनर डोके खाली वर पाय करुन वाचावा लागेल. तुमचे अभिनंदन केव्हाही करु, काम सुरु करा हा बॅनर सरळ करु असा टोला त्यांनी लगावला आहे.

आमच्या प्रयत्नाने कामं सुरू

निवडणूका आल्या, ग्रामपंचायतीचीही कामे आपण केल्याचे लोकांना सांगून कुठे तरी आपण काम केल्याचे भासवायचे. मानपाडा रोडचे काम पीडब्लूडी विभागाकडे पाठपुरावा करुन मंजूर करुन आणले. तेही काम आम्ही केले असे ते सांगतात. अशी टीकाही त्यांनी केली आहे. ठेकेदारावर प्रभाव पाडण्यासाठी ते हे सगळे करतात. त्याला आमची हरकत नाही. पण काम सुरु करा अशी आग्रही मागणी आमदार पाटील यांनी केली आहे. शीळ फाटा जवळील कल्याण फाटा ते पंजाब हॉटेल हा टेकडीवरील रस्त्यावर खड्डे पडले होते. हा रस्ता नव्याने तयार करण्यासाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी पत्रव्यवहार आणि पाठपुरावा केला होता आणि या रस्त्याचे कामही सुरू करण्यात आले.अखेर आज या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून मनसे आमदार राजू पाटील यांनी आज या रस्त्याची पाहणी केली. दरम्यान कल्याण-डोंबिवली अंबरनाथ,बदलापूर येथील नागरिक आणि प्रवाशांसाठी हा रस्ता उदयापासून खुला करण्यात येणार असून प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे पोलिसांनी आणि प्रवाशांनी आमदार पाटील यांचे आभार मानले आहेत.

‘भाजपची काळजी नको, स्वत:च्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा’, शरद पवारांना भाजपचं प्रत्युत्तर

राष्ट्रवादीचं ठरलं! नवाब मलिक यांच्या खात्यांचा पदभार काढणार, उद्या मुख्यमंत्र्यांना कळवणार

अनिल परबांचं टेन्शन वाढलं? कदमांसह खरमाटेंकडेही मोठं घबाड! Income Tax च्या हवाल्यानं सोमय्यांचा दावा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें