AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘…तर आम्ही त्यांचा आगाऊपणा मोडून काढू’, राड्यानंतर ठाकरे गटाकडून आक्रमक प्रतिक्रिया

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे, यशवंत जाधव, शितल म्हात्रे अशी दिग्गज नेत्यांनी नेतृत्व करत शिवसेनेच्या कार्यालयावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गदारोळावर ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया देण्यात आलीय.

'...तर आम्ही त्यांचा आगाऊपणा मोडून काढू', राड्यानंतर ठाकरे गटाकडून आक्रमक प्रतिक्रिया
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Dec 28, 2022 | 6:08 PM
Share

मुंबई : मुंबई महापालिकेत शिवसेनेचं कार्यालय असेलेल्या ठिकाणी मोठा राडा झाल्याची माहिती समोर आलीय. शिंदे गटाने शिवसेनेच्या कार्यालयावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. तर त्याला ठाकरे गटाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. दोन्ही गट आमनेसामने आले. दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिंदे गटाकडून पालिकेतील कार्यालयात मोठमोठ्या नेत्यांची फौज पाठवण्यात आली होती. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे, यशवंत जाधव, शितल म्हात्रे अशी दिग्गज नेत्यांनी नेतृत्व करत शिवसेनेच्या कार्यालयावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गदारोळावर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

“शिंद गटाचे काही खासदार आणि नगरसेवक जाणूनबुजून कुरापती काढण्याचे प्रकार करत आहेत. मुंबई महापालिकेतील कार्यालय आता शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्षाच्या ताब्यात आहे. आमच्या माजी महापौर, नगरसेवक नियमीतपणे तिथे बसत असतात. पण खासदार राहुल शेवाळे यांनी बेशिस्तपणाची वागणूक करुन, ठाण्याचे नरेश मस्के यांना बोलवण्याचा प्रश्नच येत नाही”, अशी भूमिका ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मांडली.

“त्यांनी कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलाय तो निषेधार्थ आहे. लोकं उभं करुन, कार्यालयात घुसून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचे पक्षाचे मुख्यमंत्री आहे. त्यांच्या गटाच्या माणसांनी अशाप्रकारे कायदा-व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण करणे योग्य नाही”, असं विनायक राऊत म्हणाले.

“मुख्यमंत्र्यांच्या माणसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं काम करणे हे निषेधार्ह आहे. सरकारने त्यांचा वेळीच बंदोबस्त करावा. महापालिकेत शिवसेनेचं कार्यालय अशा पद्धतीने कुरापत काढून घुसण्याचा प्रयत्न केला तर शिवसेनेचे नगरसेवक पूर्णपणे प्रतिकार करतील”, असा इशारा विनायक राऊत यांनी दिला.

“कार्यालयाचा वाद हा विषय येऊच शकत नाही. तिथे अधिकृतपणे शिवसेनेचं कार्यालय आहे. पण या लोकांनी आगाऊपणा करण्याचा प्रयत्न केलाय. तो पोलिसांनी मोडून काढावा. नाहीतर आम्ही मोडून काढू”, असा देखील इशारा त्यांनी दिला.

राहुल शेवाळे, यशवंत जाधव, शितल म्हात्रे हे मोठे नेते नाहीत. आमच्या कार्यालयाला धक्का देण्याचा प्रयत्न केला तर शिवसैनिक चांगल्याप्रकारे प्रतिकार करतील. शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला जातोय.

“आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी तिथे एकत्र जमा झालेले आहेत. ते आगाऊपणा करतील तर जशास तसं उत्तर देऊ”, असं विनायक राऊत म्हणाले.

दुसरीकडे शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली. “शिवसेनेच्या कार्यालयात बसण्याचा अधिकार आम्हालासुद्धा आहे. कुणाची वैयक्तिक संपत्ती नाही. ते कार्यालय ठाकरे गटाचे आहे, असं कुणी म्हणू शकत नाही. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांचं ते कार्यालय आहे”, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी दिली.

Follow Us
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ