AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणपती बाप्पांची परदेश वारी, कशासाठी जाताय बाप्पा विदेशात?

गणरायाच्या आगमनाला अद्याप सहा महिन्यांचा कालावधी आहे. परंतु मूर्तिकारांची तयारी सुरु झालीय. पुणे, मुंबई आणि कोकणातील मूर्तीकारांनी गणरायाच्या मुर्त्या बनवण्याचे काम सुरु केले आहे. या मूर्त्यांसाठी आता देशातूनच नाही तर विदेशातूनही मागणी येत आहे.

गणपती बाप्पांची परदेश वारी, कशासाठी जाताय बाप्पा विदेशात?
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 31, 2023 | 3:36 PM
Share

बदलापूर : गणेशोत्सवाला अद्याप ६ महिने बाकी असले, तरी मूर्तिकार मात्र आत्तापासूनच तयारीला लागलेत. पुणे आणि कोकणात त्याची जोरदार तयारी मूर्तीकारांनी सुरु केली आहे. आता बदलापुरातही गणरायाच्या मूर्त्या बनवण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु झाले आहे. बदलापूरच्या या मूर्त्यांना परदेशात असलेल्या भारतीयांनाकडूनही चांगली मागणी आहे. दरवर्षी कॅनडासह अमेरिका, इंग्लंड, युरोप, आखाती देश, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, ऑस्ट्रेलियात बदलापूर येथील मूर्त्या जातात. यंदाही याला सुरुवात झाली आहे. बदलापूर शहरातून गणपती बाप्पा थेट कॅनडाला रवाना झाले आहेत. परदेशातल्या भारतीयांना गणेशोत्सव साजरा करता यावा, यासाठी बदलापूरच्या चिंतामणी क्रिएशन्सच्या माध्यमातून दरवर्षी हजारो पर्यावरणपूरक गणेशमूर्ती परदेशात पाठवल्या जातात.

चिंतामणी क्रिएशनचा पुढाकार

बाप्पाचा पाहुणचार करता यावा, यासाठी बदलापूरचे तरुण उद्योजक निमेश जनवाड यांच्या चिंतामणी क्रिएशन्सकडून दरवर्षी हजारो गणपती बाप्पा परदेशात पाठवले जातात. बाप्पांचा हा प्रवास लांबचा असल्यानं अगदी ६ महिने आधीपासूनच गणपती बाप्पांच्या परदेशवारीला सुरुवात होते.

यंदा सर्वात आधी कॅनडा देशात गणपती बाप्पा रवाना झाले आहेत. पहिल्या खेपेत कॅनडाच्या व्हॅनकुव्हर शहरात अडीच हजार बाप्पा रवाना झाले आहेत. जुलै महिन्याखेरपर्यंत बाप्पांची ही परदेशवारी अखंडपणे सुरू असते, ज्यात हजारो गणपती बाप्पा आपल्या परदेशातल्या भक्तांकडे रवाना होत असतात. दरवर्षी कॅनडासह अमेरिका, इंग्लंड, युरोप, आखाती देश, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, ऑस्ट्रेलिया अशा जगातल्या अनेक देशांमध्ये निमेश जनवाड हे गणेशमूर्ती पाठवत असतात. त्यामुळे परदेशात वास्तव्याला असलेले भारतीय तिकडे राहून आपल्या लाडक्या बाप्पाचा पाहुणचार करू शकतात.

अशी मिळाली संधी

निमेश जनवाड या तरुण उद्योजकाने मागील ६ वर्षांपासून गणेशमूर्ती निर्यात करायला सुरुवात केली. मसालाकिंग धनंजय दातार यांनी त्याला संधी दिली. २०१७ साली चिंतामणी क्रिएशन्स या व्यवसायाची सुरुवात केली. मग २०१८ साली ३ हजार आणि २०१९ साली साडेतीन हजार गणेशमूर्ती परदेशात पाठवल्या होत्या.

तर २०२० साली कोरोनामुळे निर्यात बंद झाल्यानं त्याला तब्बल ४० लाख रुपयांचा फटका बसला होता. त्यानंतर २०२१ साली त्याने मोठी झेप घेत २० हजार गणेशमूर्ती निर्यात केल्या होत्या, तर २०२२ साली त्याने ३५ हजार गणेशमूर्ती परदेशात पाठवत नवीन विक्रम केला होता. यंदाच्या वर्षी त्याच्याही पुढे जात तब्बल ४५ ते ५० हजार गणेशमूर्ती परदेशात पाठवण्याची तयारी केली आहे. त्यांनी पाठवलेल्या गणेशमूर्तींमुळे परदेशातल्या भारतीयांचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?