AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi : त्यांची तर हवा निघाली…सीमेवर पेट्रोलिंगचा वाद, चीनचे नाव घेत राहुल गांधींचा मोदी-शाह-राजनाथ सिंह यांच्यावर बॉम्बगोळा

Rahul Gandhi on Modi -Shah - Rajnath Shingh: रचनात्मक काँग्रेस राष्ट्रीय अधिवेशनाला संबोधित करताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. त्यांनी चीन भारतीय सीमेत घुसल्याचा दावा करत केंद्र सरकारवर तिखट प्रतिक्रिया दिली. त्यांनी चीनच्या डिप्लोपसीवर मोठे भाष्य केले.

Rahul Gandhi : त्यांची तर हवा निघाली...सीमेवर पेट्रोलिंगचा वाद, चीनचे नाव घेत राहुल गांधींचा मोदी-शाह-राजनाथ सिंह यांच्यावर बॉम्बगोळा
राहुल गांधीImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Aug 13, 2026 | 5:54 PM
Share

काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर कडाडून प्रहार केला. रचनात्मक काँग्रेस राष्ट्रीय अधिवेशनाला संबोधित करताना त्यांनी भारताचे परराष्ट्र धोरण, चीनचे भारतीय हद्दीतील अतिक्रमण आणि इतर अनेक मुद्यांवरून सरकारला चांगले घेरले. दिल्लीतील या अधिवेशनात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर कडाडून प्रहार केला. त्यांच्या वक्तव्यामुळे वातावरण तापण्याची चिन्हं आहेत.

भारताला इंदिरा गांधी सारख्या नेत्याची गरज

जर भारताने त्याची ताकद ओळखली असती. इंदिरा गांधी सारखा भारताचा नेता असता. तर भारतासाठी सर्वात मोठी संधी होती. इराण आपला जुना मित्र, अमेरिका आपला जुना मित्र, रशियाही आपला मित्र. या तिघांमध्ये मैत्री वाढवण्यासाठी मध्यस्थाची भूमिका निभावली असती. पण झालं काय? आपली संधी पाकिस्तानने पळवली. पाकिस्तान मध्यस्थ झाला. मोदी हे बघतच राहिले. आता काय झाले. माध्यमं हे काही सांगत नाही. मला तर आता मोदींच्या कार्यालयातून माहिती मिळते, असा टोला त्यांनी लगावला.

मोदी-शाह-राजनाथ सिंह यांच्यावर निशाणा

भारताच्या सीमेत अरुणाचल प्रदेशात चीनने आपल्याला पेट्रोलिंग करण्यास मनाई केली. तुमची जमीन आहे हे ठीक आहे, पण तुम्ही इथं पेट्रोलिंग करू शकत नाही. राजनाथ सिंह, अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांची हवा निघाली आहे. ते काय करत आहेत. ऑपरेशन सध्या सुरू आहे. ही बातमी दाबण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. कोणताही विचार न करता हे देशाचं नुकसान करत आहे. मी पाहिलं. गलवाणनंतर पंतप्रधान झूम कॉलवर आले. मोदी म्हणाले की भारताची एक इंचही जागा चीनने घेतली नाही. त्यानंतर आर्मी म्हणते की देशाची जमीन तर घेऊन गेले. तुम्ही विचार करा. चीनला संदेश काय गेला? चीनच्या मध्यस्थाने भारताच्या मध्यस्थला सांगितले की, तुमच्या पंतप्रधानांनी दावा केला आहे की तुमची जमीन आम्ही घेतलेली नाही. यांनी आतून देश संपवला आहे. परराष्ट्र धोरण गुंडाळलं आहे आणि सर्वच काम पक्षाचे स्ट्रक्चर उभे करण्यासाठी, अदानींना फायनान्स करण्यासाठी त्यांनी वापरले, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला.

घाबरण्याचे कारण काय?

राहुल गांधी यांनी यावेळी जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलनाचा दाखला देत सरकारवर हल्लाबोल केला. विद्यार्थी आपला आवाज उठवत होते. पण सरकारला ते नको होते. मी उत्तराखंडमध्ये एका बलात्कार पीडितेला भेटलो. त्यांना न्याय भेटला नाही. सरकारला लोकांचे म्हणणे ऐकून घ्यायचे नाही. आम्ही यांना वेडे करू. जर मी ऑर्डर देणाऱ्यांना घाबरलो असतो तर असे मनमोकळेपणे बोललो नसतो. देशातील अनेक लोक भित्रेपणाने वागत आहे. भित्र्यांच्या एका गटासमोर ते भयभीत आहेत. तो केवळ विदुषकांचा समूह आहे. त्यांना घाबरण्याचे काय कारण आहे? असा सवाल करत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्ला चढवला.

Follow Us
इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे...
Sanjay Raut : इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे....
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
SC Reservation : निर्णय झाला, पण अंमलबजावणी कुठे? अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
S. Chockalingam : मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
Shweta Mahale : बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; श्वेता महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार?; भायखळा ते....
Thackeray Brothers : 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार? राज-उद्धव ठाकरे 11.30 वाजता पत्रकार परिषद घेणार; भायखळा ते...
धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून..
Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून...., नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...
Mahayuti : एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...; शिवसेना आमदाराने सगळंच सांगून टाकलं
उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न!
Thakurli : उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न! वाळवी, पाणी अन्.... रहिवाशांचा संताप
अंगारक चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिराबाहेर भक्तांची गर्दी
Angarki Chaturthi : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी रात्रीपासूनच भक्तांची गर्दी; सिद्धिविनायक अन् दगडूशेठ मंदिराबाहेर लांबच लांब रांगा
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत