
सिंधुदुर्गमधील सावंतवाडी येथील रोनापाल जंगलात मिळालेल्या अमेरिकन महिलेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. एका गुराख्याला ही महिला दिसली होती. त्यानंतर पोलिसांनी महिलेला उपचारासाठी रूग्णालयात नेलं होतं. महिलेने पोलिसांनी एक कागदावर आपल्याला पतीने बांधून ठेवल्याचा आरोप तिने केला होता. पोलिसांनी या अनुशंगाने तपास सुरु केला त्यानंतर तपासामध्ये महिलेने सांगितल्याप्रमाणे काहीही आढळून आलं नाहीच. या अमेरिकन महिलेचा तो बनावच असल्याची दाट शक्यता आता वाटू लागली आहे. मानसिक संतुलन बिघडलेल्या अवस्थेत तिने स्वत हुन हा प्रकार करून घेत समाजासह पोलीस आणि प्रकार करून घेत समाजाराहू आरोग्य यंत्रणेची झोपच उडवून देण्याचा प्रयत्न केल्याचे एकंदर तपासकामामध्ये पुढे येत असल्याचे उघड झालेल्या बाबींवरून दिसून येत आहे.
या महिलेने दिलेल्या आपल्या एकमेव जबाबात ‘नवऱ्याने आपणास या जंगलात आणून बांधून ठेवल्याचं आणि आपणास उपाशी ठेवून आपला शारीरिक छळ केल्याचे स्पष्ट केले होते. या तिच्या प्राथमिक जबाबानुसार पोलिसांनी तिच्या नवऱ्याविरुद्ध गुन्हादेखील दाखल केला परंतु, आठवडाभराच्या तपासात ‘त्या’ महिलेने दिलेल्या पत्त्यावर तिने नवरा म्हणून ज्या व्यक्तीचे नाव दिले, त्या नावाच्या व्यक्तीचे अस्तित्व कुठेच आढळून आले नाही.
इतकंच नाही तर तिने तामिळनाडूच्या आपल्या निवासस्थानाचा जो परमनंट अॅड्रेस दिला होता, त्या अॅड्रेसवर निवासस्थान नसून एक दुकान असल्याचे आढळून आले. वरील शक्यतेला पुष्टी देणारी सर्वात धक्कादायक बाब अशी की, काही महिन्यांपूर्वी तिच्यावर गोव्यातील बांबोळी येथील इस्पितळात तसेच अन्य काही इस्पितळांमध्ये मानसिक उपचार झाल्याचेदेखील उघडकीस आले.
आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे सदर महिलेजवळील मोबाईल व टॅबवर आढळलेल्या माहितीनुसार त्या महिलेचा मुंबई आणि गोवा येथील आतापर्यंत जो वावर आढळून आला, तिथे ती एकटीच आढळून आली आहे. त्यामुळे ती ज्या स्थितीत जंगलात आढळून आली आणि तिने जो जबाब दिला, तो बनाव असल्याची शक्यता अधिक वाटत आहे. वरील सर्व शक्यता वाटत असल्या तरी सिंधुदुर्ग पोलिसांनी मात्र याबाबत ठोस अस काहीही स्पष्ट केलेलं नाही.या महिलेला आता अधिक उपचाराकरिता रत्नागिरी येथील शासकीय मनोरुग्णालयात उपचाराकरता पाठविण्यात आलं आहे.