‘मावळा’ पहिली मोहीम फत्ते करणार, कोस्टल रोड कधीपर्यंत पूर्ण होणार? वाचा सविस्तर

| Updated on: Jan 10, 2022 | 5:27 PM

कोस्टल रोडचे काम पूर्ण झाल्यावर मुंबईकरांचे इंधन आणि मौल्यवान वेळ दोन्ही वाचणार आहे. यामुळे 34 टक्के इंधन आणि 70 टक्के वेळ वाचणार असल्याचे सांगितले जाते.

मावळा पहिली मोहीम फत्ते करणार, कोस्टल रोड कधीपर्यंत पूर्ण होणार? वाचा सविस्तर
mumbai costal road
Follow us on

मुंबई : मुंबईसाठी अत्यंत महत्वााचा असाणार कोस्टड रोडचा प्रकल्प एक महत्वाचा टप्पा ओलांडत आहे. प्रियदर्शनी ते गिरगाव चौपाटीपर्यंत बोगद्याचे काम पूर्ण होत आले आहे, लवकरच मावळा ही टनेल बोरिंग मशीन गिरगाव चौपाटीवर बाहेर पडणार आहे. 12.20 मीटर रुंद आणि 2.070 किमी लांब अशा एका बाजुचे तीन मार्ग असलेल्या बोगड्याचे काम आता पूर्ण होणार आहे. अशी माहिती कोस्टल रोड प्रकल्पाचे मुख्य अभियंता विजय निघोट यांनी दिली आहे. समुद्राखाली खोदलेला हा देशातील पहिलाच बोगदा आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी कोस्टल रोडचा हा महत्वपूर्ण प्रक्लप हाती घेण्यात आला आहे.

इंधन आणि वेळ वाचणार

कोस्टल रोडचे काम पूर्ण झाल्यावर मुंबईकरांचे इंधन आणि मौल्यवान वेळ दोन्ही वाचणार आहे. यामुळे 34 टक्के इंधन आणि 70 टक्के वेळ वाचणार असल्याचे सांगितले जाते. दोन्ही बाजुच्या वाहतुकीसाठी दोन बोगद्यांचे काम सध्या जोमाने सुरू आहे. प्रिसेंस स्ट्रीट फ्लाय ओव्हर ते वरळी सी-लिक कोस्टल रोडचे कामही वेगवान सुरू आहे. यात प्रियदर्शनी पार्क ते छोटा चौपाटीदरम्यान तीन लेन असलेले दोन बोगदे बाधण्यात येणार आहे. यातील पहिल्या बोगद्यााचे काम उद्या पूर्ण होत आहे. हा संपूर्ण प्रकल्प डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण व्हावा यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत, यात महापालिका आयुक्त इक्बाल चहल आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडेही लक्ष घालत आहे.

दुसऱ्या बोगद्याच्या कामासाठी मावळा निघणार

दोन्ही बोगद्यांचे काम प्रियदर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटी मार्गावर केले जाणार आहे. वेळ आणि खर्चात बचत करण्यासाठी गिरवाग चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क मार्ग स्वीकारण्याचा सल्ला सल्लागारांनी दिला आहे, त्याप्रमाणे हे काम सुरू आहे. उद्या ही मोहिम फत्ते केल्यानंतर गिरगाव चौपटीवरच मावळचे भाग वेगळे करून त्याला पुन्हा जोडून वेगळ्या मोहिमेवर पाठवण्यात येणार आहे. उद्या पहिल्या बोगद्याचे काम पूर्ण झाल्यावर दुसऱ्या बोगद्याचे काम मार्च आखेरीपासून किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दुसऱ्या बोगद्याचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे.

‘यापुढे प्रत्येक मृत्यूला शरद पवार जबाबदार असतील’, पवारांच्या पत्रकार परिषदेवर सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया

सेन्सेक्सला ‘तेजी’चा डोस: 651 अंकांची वाढ, गुंतवणूकदार 2.33 लाख कोटींनी मालामाल!

Corona : कल्याण एपीएमसी चा मोठा निर्णय, अगोदर नियमावली आता थेट बाजारच बंद