सेन्सेक्सला ‘तेजी’चा डोस: 651 अंकांची वाढ, गुंतवणूकदार 2.33 लाख कोटींनी मालामाल!

टायटन, मारुती सुझुकी, एसबीआय आणि एल अँड टी सर्वोच्च कामगिरी करणारे ठरले. विप्रो, नेस्ले इंडिया, एशियन पेंट्स, पॉवरग्रिडच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. आ

सेन्सेक्सला ‘तेजी’चा डोस: 651 अंकांची वाढ, गुंतवणूकदार 2.33 लाख कोटींनी मालामाल!
गुंतवणूक हजारात, रिटर्न लाखात; शेअर फसवणुकीचा ‘सोशल’ पॅटर्न!

नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय बाजारात पडछडीनंतर तेजीचं वातावरण पाहायला मिळालं. आंतरराष्ट्रीय व्यवहारांतील तेजीचा थेट परिणाम आठवड्यातील पहिल्याच दिवशी शेअर बाजारात पाहायला मिळाला. आज (सोमवारी) 30 शेअर्सचा इंडेक्स 651 अंकांच्या वाढीसह 60395 वर बंद झाला. तर निफ्टी 190 अंकांच्या तेजीसह 18003 वर बंद झाला. आज सेंन्सेक्सच्या टॉप-30 मध्ये 20 शेअर्स तेजीसह आणि 10 शेअर्स घसरणीसह बंद झाले. गेल्या दोन महिन्यात बाजार आज सर्वोच्च स्तरावर बंद झाला.

टायटन, मारुती सुझुकी, एसबीआय आणि एल अँड टी सर्वोच्च कामगिरी करणारे ठरले. विप्रो, नेस्ले इंडिया, एशियन पेंट्स, पॉवरग्रिडच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. आजच्या तेजीत निफ्टी बँक, ऑटो, फायनान्शियल्स सर्व्हिस, PSU बँकिंग इंडेक्स यांचा सर्वाधिक सहभाग नोंदविला गेला. आज तेजीसह BSE यादीतील सर्व कंपन्यांचा मार्केट कॅप वाढीसह 274.67 लाख करोड वर पोहोचला. मागील व्यवहाराच्या सत्रात मार्केट कॅप 272.34 लाख करोड रुपयांचा होता. एका दिवसात गुंतवणूकदार 2.33 लाख कोटी रुपयांसह मालामाल झाले.

आंतरराष्ट्रीय पडझडीनंतर तेजी

आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण आणि कोविड बाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर्स मार्केटमध्ये तेजी नोंदविली गेली. सार्वजनिक वित्तीय बँकांची कामगिरीतही वाढ नोंदविली गेली. आगामी अर्थसंकल्पात सरकारी बँकेत परकीय गुंतवणूक मर्यादा 20 टक्क्यांवरुन 74 टक्के करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बांधकाम क्षेत्रातही विक्री संख्येतील वाढीमुळे तेजीचे वातावरण आहे.

Published On - 4:51 pm, Mon, 10 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI