देशातील सर्वात महागडी घरे मायानगरी मुंबईत, सुपर लक्झरी घरांच्या विक्रीत वाढ…

मुंबईला आज जागतिक ओळख मिळालेली आहे. यासाठी वर्षानुवर्षांची मेहनत आणि विकासाचा परिणाम यामुळे येथे लोकांना रहायला आवडते. मुंबई आता न्यूयॉर्क आणि हाँगकाँग सारख्या ग्लोबल शहरांच्या पंक्तीत उभी आहे.

देशातील सर्वात महागडी घरे मायानगरी मुंबईत, सुपर लक्झरी घरांच्या विक्रीत वाढ...
prabhadevi skyline
| Updated on: Feb 16, 2026 | 6:20 PM

मुंबईला स्वप्नांचे शहर म्हटले जाते. मुंबई कोणासही उपाशी ठेवत नाही. येथे प्रत्येकाच्या हाताला काम मिळते. केवळ मेहनत करण्याची गरज असते. परंतू आता ही मुंबई अब्जाधीशांचे पसंतीचे हब म्हणून पुढे येत आहेत. मुंबईतील जागांचे दर इतके वाढले आहेत की आता मुंबईने जागेच्या दरात लंडन आणि सिंगापूरलाही मागे टाकले आहे. अब्जाधीशांमध्ये येथे घर विकत घेण्यासाठी अगदी चढाओढ सुरु आहे. येथील शंभर कोटी रुपयांचे फ्लॅट आणि पेंटहाऊस क्षणात विकले जात आहेत. संपूर्ण भारतात जेवढी सुपर लक्झरी घरे विकली गेली, त्यातील ८८ टक्के घरे एकट्या मुंबईत विकली गेली आहेत. जगभरात आर्थिक संकट सुरु असताना मुंबईच्या जागांना मात्र सोन्याचे भाव आले आहेत. काय आहे यामागे कारण वाचूयात…

आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या संशोधनानुसार मुंबई जगातील त्या शहरांमध्ये समाविष्ट आहे जिथे लक्झरी घरांच्या किंमती सर्वाधिक जास्त वेगाने वाढत आहेत. मुंबईतल साल २०२४ मध्ये देशात ४० कोटी रुपयांहून महागड्या दराने विक्री झालेल्या ५९ घरापैकी ५२ घरे एकट्या मुंबईतील होती. यातील १६ घरांची किंमत तर १०० कोटींहून अधिक रकमेची होती.

वांद्रे वेस्ट, प्रभादेवी आणि ताडदेव भागातील घरे

मुंबईच्या महागड्या घरांचा अंदाज यावरुन येऊ शकतो की साल २०२५ मध्ये येथील लक्झरी मार्केटने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. अब्जाधीशांची मायानगरी म्हणून ओळखल्या या मायानगरीतील श्रीमंतांनी घरांवर जे पैसे खर्च केले त्याचे आकडे वाचून तुम्हाला धक्का बसेल. वर्षाच्या सुरुवातीलाच सहा महिन्यात १० कोटी रुपयांवरुन महागड्या घरांचा विक्रीचा आकडा हा १४,७५० कोटी रुपयांच्या पलिकडे गेला आहे. गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षांचा आकडा पाहिला तर तो २८,७५० कोटी रुपये आहे. आज वांद्रे वेस्ट, प्रभादेवी आणि ताडदेव सारख्या भागात घर विकत घेणे हे श्रीमंतासाठी एक मोठे स्टेटस सिम्बॉल बनले आहे.

स्टेटस आणि सुरक्षेसाठी घर खरेदी

अखेर मुंबईत घर घेण्यासाठी अब्जाधीशांची रांग का लागली आहे. याचे कारण मोठे रंजक आहे. लक्झरी घर खरेदी करणे हे आता केवळ रहाण्याची जागा हा निव्वळ हेतू नाही राहिला तर सुरक्षित गुंतवणूक मानला जात आहे. श्रीमंतांना मुंबईची आर्थिक मजबूती आणि येथील जमीनीच्या किंमतींवर संपूर्ण भरोसा आहे. दक्षिण मुंबई घर खरेदी करणे हे आता अब्जाधीशांसाठी एक स्टेटस सिम्बॉल बनले आहे. कारण येथील जमीनीला प्रचंड मागणी आहे.आज अब्जाधीश केवळ चार भिंती खरेदी करु इच्छीत नाहीत. त्यांनी या भागाचे भविष्य आणि आपली लाईफस्टाईल दावणीवर लावली आहे. मुंबई आता न्यूयॉर्क आणि हाँगकाँग सारख्या ग्लोबल शहराच्या यादीत उभी आहे. येथे घर खरेदी करणे एक स्टेटस सिम्बॉल सह संपत्तीला सुरक्षित राखण्याची एक नामी संधी मानली जात आहे.

 

Follow Us