मायानगरीत अजून एक मायावी पूल! देशातील सर्वात लांब फ्लायओव्हरवरुन करा लवकरच प्रवास

| Updated on: Mar 20, 2024 | 9:56 AM

SEA Flyover | मुंबईत अनेक प्रकल्प सुरु आहेत. काहीचे काम पूर्ण झाले आहे. वाहतूक कोंडीच्या समस्येवर उतारा शोधण्यासाठी अनेक अभिनव प्रयोग करण्यात येत आहे. वरळी सी-लिंकची चर्चा झाली. इतर पण अनेक प्रकल्प निर्माणाधीन आहे. त्यात आता देशातील या सर्वात लांब सी-लिंकची पण चर्चा होत आहे.

मायानगरीत अजून एक मायावी पूल! देशातील सर्वात लांब फ्लायओव्हरवरुन करा लवकरच प्रवास
Follow us on

मुंबई | 20 March 2024 : चोहो बाजूंनी विशालकाय समुद्र आणि त्यामधून तुमची सूसाट धावणारी कार, काय मज्जा येईल , नाही? ते पण 10-20 किलोमीटर नाही तर 43 किलोमीटरचा हा नजारा तुमच्या डोळ्याचे पारणे फेडल्याशिवाय राहणार नाही. नुसत्या विचारानेच तुमच्या अंगावर रोमांच उठले असतील. पण मायानगरीत लवकरच हा मायावी उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. त्यामुळे एका टोकावरील उपनगरवासीय अवघ्या काही मिनिटांत मुंबईत दाखल होतील. जवळपास अडीच तासांचे अंतर अवघ्या 30 मिनिटांत कापल्या जाईल.

देशातील सर्वात लांबीचा उड्डाणपूल

मुंबईतील आतापर्यंतचा हा सर्वात महत्वकांक्षी प्रकल्प आहे. लवकरच त्याची सुरुवात होईल. या प्रकल्पाच्या अर्ध्या टप्प्याला अगोदरच मंजूरी मिळाली आहे. राज्य सरकारने त्याला मंजूरी दिली आहे. मुंबईत वर्सोवा ते विरारपर्यंत फ्लायओव्हरमुळे जोडल्या जाईल. हे 43 किलोमीटर अंतर आहे. तर हा प्रकल्प पुढे पालघरपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. समुद्रातील हा उड्डाणपूल देशातील सर्वाधिक लांबीचा असेल.

हे सुद्धा वाचा

लवकरच कामाचा श्रीगणेशा

वर्सोवा ते विरार हा प्रवास मुंबईकरांना घामाटा फोडणारा आहे. दोन्ही शहरातील अंतर जवळपास 58 किलोमीटर आहे. या दरम्यान वाहतूक कोंडीमुळे हा प्रवास पूर्ण होण्यासाठी जवळपास 2.50 तासांहून अधिकचा काळ लागतो. नवीन उड्डाणपूल हा या समस्येवरचा तोडगा आहे. या उड्डाणपुलामुळे विरार ते वर्सोवा हे अंतर अवघ्या 30 मिनिटात कापता येईल.

8 पदरी उड्डाणपूल

हा उड्डाणपूल ना केवळ देशातील सर्वात लांब समूद्र पूल असेल पण रुंदीतही तो भाव खाऊन जाणार आहे. हा उड्डाणपूल 8 पदरी असेल. या उड्डाणपुलासाठी जवळपास 64 हजार कोटी रुपये खर्चाची शक्यता आहे. फ्लायओव्हरच्या दोन्ही बाजूंनी 4-4 मार्गिका असतील. या समुद्र मार्गवर चारकोप, मीरा भायंदर आणि वसाई सारखी मोठी उपनगर जोडण्यात येतील.

समुद्रात एक किलोमीटर आत फ्लायओव्हर

हा फ्लायओव्हर समुद्रात एक किलोमीटर आत असेल. हा प्रकल्प कधी पूर्ण करण्यात येणार, याची डेडलाईन अजून समोर आलेली नाही. पण पुढील 6 ते 7 वर्षात हा उड्डाणपूल वाहतूकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
21.8 किलोमीटर लांब अटल सेतूचे उद्धघाटन केले होते.