AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lok Sabha Elections : महाविकास आघाडीत ठाकरे गट किती जागा लढवणार?, आकडा आला समोर; शिंदे गटाची डोकेदुखी वाढणार?

Sanjay Rau talk on Loksabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. इंडिया आघाडी भाजपला सत्तेतून बाहेर करण्यासाठी आपली सर्व ताकद लावेल. सत्ता वाटपाबाबत बोलताना ठाकरे गटाच्या संजय राऊत यांनी आपला आकडा जाहीर केला आहे.

Lok Sabha Elections : महाविकास आघाडीत ठाकरे गट किती जागा लढवणार?, आकडा आला समोर; शिंदे गटाची डोकेदुखी वाढणार?
sanjay-raut-cm-eknath-shinde
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Dec 22, 2023 | 8:03 PM
Share

मुंबई : येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. भाजपला सत्तेतून पायउतार करण्यासाठी देशातील सर्व विरोधक एकत्र आले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे इंडिया आघाडीचं नेतृत्त्व करत आहेत. इंडिया आघाडीसमोर जागा वाटपाचं मोठं आव्हान असणार आहे.  अशातच ठाकरे गट महाराष्ट्रातील किती लोकसभा जागांवर निवडणूक लढणार आहे? याबाबत ठाकरे गटाची मुलुखमैदानी तोफ संजय राऊत यांनी थेट आकडाच जाहीर केला आहे.

इतक्या जागांवर ठाकरे गट लढणार लोकसभेची निवडणूक?

उद्धव ठाकरे दिल्लीत गेले तेव्हा राहुल गांधी, सोनिया गांधी ,खर्गे आम्ही एकत्र बसून चर्चा केली आहे. त्या चर्चेत काय घडलं ते लाच माहिती आहे जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रात नाही दिल्लीत त्याची चर्चा होईल, आम्ही 23 जागा लढू. प्रकाश आंबेडकर यांची देखील चर्चा अंतिम टप्प्यात आलेली आहे ,ते महाविकास आघाडी इंडिया आलायन्स मध्ये असावेत,साअसं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना राऊतांनी अयोध्येतील राराम मंदिर उद्घाटन सोहळ्यावरूनही निशाणा साधला आहे.

शिवसेनेला निमंत्रण नाही, उद्धव ठाकरे यांना निमंत्रण नाही. बाळासाहेब ठाकरे यांना देखील त्यांनी निमंत्रण दिलं नसतं. कारण हे श्रेय घेण्याचं राजकीय चढाईचा भाग बनला आहे. राम मंदिर उद्घाटन सोहळा आयोध्या मध्ये राम मंदिर बनना शिवसेनेचे मोठं योगदान आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे देखील योगदान मोठ आहे. आम्हाला ते बोलणार नाही उद्धव ठाकरे त्या ठिकाणी गेले तर बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचा जयजयकार होईल. ज्यांचे योगदान आहे त्यांना सन्मानाने कधीच बोलणार नाही. प्रभू श्रीराम हे सर्वांचे आहेत ते एका राजकीय पक्षाचे किंवा नेत्याची जहागीर नसल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यातील जागावाटप कशा प्रकारे होतं हेसुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लोकसभेच्या 48 जागांसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा