Maharashtra Corona Update : राज्यात आज 4,154 नवे कोरोना रुग्ण, बरे होण्याचे प्रमाण 97.5 टक्के

| Updated on: Sep 10, 2021 | 10:00 PM

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 5,57,02,628 नमुन्यांपैकी 64 लाख 91 हजार179 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. महाराष्ट्राचा मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे.

Maharashtra Corona Update : राज्यात आज 4,154 नवे कोरोना रुग्ण, बरे होण्याचे प्रमाण 97.5 टक्के
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुंबई : ऐन सणासुदीच्या दिवसांत कोरोना विषाणूच्या संसर्गाने महाराष्ट्राची चिंता वाढवण्यास सुरुवात केली आहे. राज्यात आज कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढल्याचं चित्र दिसत आहे. दिवसभरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले 4 हजार 154 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर 44 रुग्णांचा कोरोनाची बाधा होऊन मृत्यू झाला आहे. याचवेळी 24 तासांत 4 हजार 524 रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे कोरोनमुक्तीचा दर 97.5 टक्क्यांवर पोहोचला आहे.

मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 5,57,02,628 नमुन्यांपैकी 64 लाख 91 हजार179 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. महाराष्ट्राचा मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या 2 लाख 92 हजार 530 व्यक्ती होम क्वारंटाईन असून 2 हजार 357 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यात 2 लाख 96 हजार 579 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 1 हजार 952 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज एकूण 4 हजार 524 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आजपर्यंत 62 लाख 99 हजार 760 रुग्ण बरे होऊन घरी गेले.

मुंबईत 441 रुग्णांची नोंद

मुंबई शुक्रवारी 441 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय मुंबईत सध्या 4 हजार 732 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईचा कोरोना रुग्ण बरे होण्याच दर 97 टक्केंवर पोहोचला आहे. राजधानीतील कोरोनाबाधितांची संख्या 7 लाख 34 हजार 337 वर पोहोचली आहे. मुंबईत कोरोना विषाणू संसर्गामुळं 16 हजार 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 7 लाख 11 हजार 147 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

सणासुदीत खरेदीसाठी गर्दी; ठाण्याचीही चिंता वाढली

ठाण्यातही कोरोनाची रुग्णवाढ सुरूच आहे. आज ठाणे महापालिका हद्दीत 73 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर जिल्ह्यात 50 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले. तसेच नवी मुंबई महापालिका हद्दीत 74, कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत 82 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. या महापालिकांनी ठाणे जिल्ह्याची चिंता वाढवली आहे. सणासुदीच्या दिवसांत लोक खरेदीच्या निमित्ताने गर्दी करू लागले आहेत. बाजारपेठांमध्ये सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडत असल्यामुळे एकप्रकारे कोरोनाच्या संसर्गाला निमंत्रण मिळू लागले आहे.

इतर बातम्या

काल शरद पवारांनी सुनावलं आज रजनी पाटलांनी, राहुल गांधींना तोंडावर काँग्रेसची कमजोरी सांगितली

Aurangabad Gold: गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सोने अजून स्वस्तच, चांदीच्या दरातही घसरण, पहा आजचे भाव