AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad Gold: गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सोने अजून स्वस्तच, चांदीच्या दरातही घसरण, पहा आजचे भाव

HDFC सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

Aurangabad Gold: गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सोने अजून स्वस्तच, चांदीच्या दरातही घसरण, पहा आजचे भाव
| Edited By: | Updated on: Sep 10, 2021 | 8:56 PM
Share

औरंगाबाद: सोने आणि चांदीच्या दरातील अस्थिरता अजूनही कायम आहे. सोमवारपासून सोने आणि चांदीच्या दरात प्रचंड अस्थिरता दिसून येत आहे. आजही औरंगाबादच्या सराफा बाजारात (Aurangabad Sarafa Market) हेच चित्र दिसून आले. बुधवारच्या घसरणीनंतर सोन्याने गुरुवारी वाढ घेण्याची काहीशी धडपड केली. मात्र आज शुक्रवारी दरांनी पुन्हा एकदा लोळण घेतल्याचे चित्र आहे.

शहरात शुक्रवारी सोन्याचा भाव काय?

आज औरंगाबादच्या सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचे भाव 46,800 रुपये प्रति तोळा असे होते. म्हणजेच गुरुवारच्या दरांपेक्षा सोन्याच्या दरात 200 रुपयांची घसरण झाली. गुरुवारी औरंगाबादध्ये 22 कॅरेटच्या सोन्याचे भाव 47,000 रुपये प्रति तोळा असे होते.

चांदीचे आजचे भाव काय?

चांदीच्या दरातही आज 300 रुपयांची घसरण दिसून आली. औरंगाबादच्या सराफा बाजारात आज शुद्ध चांदीचा भाव 66700 रुपये प्रति किलो एवढा होता. गुरुवारी हे दर 67,000 रुपये प्रति किलो एवढे होते. सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही या आठवड्यात चांगलाच चढ-उतार दिसून आला.

दुप्पट होऊ शकतो सोन्याचा दर

पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किंमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. HDFC सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस (Stimulus Package) दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे. (Gold and silver rate in Aurangabad sarafa market, Maharashtra)

इतर बातम्या- 

Aurangabad Alert: मिठाई खरेदी करताना सावधान, ट्रेवर Best Before Date लिहिलंय का पहा

लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी बाजारात गर्दी, औरंगाबादेत बालगणेशाच्या मोहक मूर्तींची भूरळ

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.