AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : ‘शरद पवार यांच्यामुळेच मी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला’; भुजबळांनी पवारांवरच दिलं ढकलून!

अजित पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते आहेत. राज्यातच नाहीतर देशभर या शपविधीची चर्चा आहे. हे नेते शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. यामधील छगन भुजबळ यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

Ajit Pawar : 'शरद पवार यांच्यामुळेच मी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला'; भुजबळांनी पवारांवरच दिलं ढकलून!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jul 02, 2023 | 10:32 PM
Share

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूंकप झाला आहे. 2019 च्या निवडणूकीनंतर आतापर्यंत महाराष्ट्राच्या जनतेने 3 सरकार पाहिली आहेत. फायरब्रँड नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते आहेत. राज्यातच नाहीतर देशभर या शपविधीची चर्चा आहे. यामध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल, अदिती तटकरे यांच्यासारखे नेते आहेत. हे नेते शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. यामधील छगन भुजबळ यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

शरद पवारांनी आम्हाला काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं, 2024 ला पंतप्रधान मोदी हेच देशाचे नेतृत्व करणार आहे, तेच पंतप्रधान म्हणून पुन्हा निवडूण येणार आहे. यामुळेच आम्ही हा सकारात्मक निर्णय घेतला आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला मदत केली पाहिजे, देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे. विनाकारण रस्त्यावर भांडण करून काहीही फायदा होणार नसल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

भाजप- शिवसेना युतीत बिनसल्यानंतर फडणवीस यांनी अजित पवार यांच्या सोबत सरकार स्थापन केलं होतं. पण, हे सरकार 72 तासांच्या आतच पडले. यानंतर महाविकास आघाडी हा नवीन प्रयोग घडला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. थोड्याच काळात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून, भाजपसोबत सरकार बनवले. आता यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही (अजित पवार गट) सामील झाला आहे.

दरम्यान, छगन भुजबळ हे महाविकास आघाडी सरकारमध्येही मंत्री  होते. महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर आघाडीतील नेत्यांची मंत्रिपद गेली होती. मात्र आता अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला त्यासोबतच भुजबळही त्यांच्यासोबत सामील झाले. आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांना परत एकदा मंत्रिपदाची माळ गळ्यात पडली आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?