AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्यांना ताकदवान लोक नको, गुलाम लोकं पाहिजेत, बंडखोर संजय दिना पाटील यांचा पलटवार

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून दुसऱ्यांदा फूट होऊन बाहेर पडलेल्या सहा खासदारांनी आज अखेर रितसर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या खासदारांपैकी संजय दिना पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रीया दिली आहे.

त्यांना ताकदवान लोक नको, गुलाम लोकं पाहिजेत, बंडखोर संजय दिना पाटील यांचा पलटवार
Sanjay dina patil
| Updated on: Jun 22, 2026 | 7:40 PM
Share

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात आज अखेर उबाटाच्या सहा बंडखोर खासदारांनी प्रवेश केला आहे. या यशवंतराव सेंटर येथे या बंडखोर खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला. त्यानंतर ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना आपली पहिली प्रतिक्रीया दिली आहे. शिवसेनेत मला एका व्यक्तीचा प्रॉब्लेम होता. त्याचामुळे मी हा पक्ष सोडल्याचा दावा यावेळी पाटील यांनी केला आहे.

मला एकाच व्यक्तीचा प्रॉब्लेम आहे. जो माझ्या तोंडासमोर गोड बोलायचा आणि मागून शिव्या द्यायचा असा आरोप संजय दिना पाटील यांनी यावेळी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी काल भांडुपमध्ये येऊन येथील जनतेची माफी मागितली. त्याविषयावर बोलताना संजय दिना पाटील म्हणाले की हेच जर आधी केले असते  मला त्रास देणाऱ्याला आणि मला एकत्र बसवून तोडगा काढला असता तर मी गेलोच नसतो आणि कोरम पूर्ण झाला नसता, यांना ताकदवान लोक नको आहे. यांना केवळ गुलाम लोक हवेत आहेत असेही संजय दिना पाटील यावेळी म्हणाले.

तुमचा रोख उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे का ? असे विचारता त्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांची फॅमिली यांच्याविषयी माझी काही तक्रार नाही. त्यांनी मला मान दिला. आणि कोणीमाझ्यासाठी एक रुपयाचे केले तर मी त्याच्यासाठी शंभर रुपयांचे करतो हे सर्वांना माहिती आहे. मला केवळ एकाच व्यक्तीचा त्रास होतो. स्टेजवर बसून शिव्या देऊ लागले.  तो शाखाप्रमुखांना सांगायचा माझ्याकडे जाऊ नको. आणि वर तक्रार करायचा हा संघटनेच्या कार्यक्रमाला येत नाही अशीही तक्रार यावेळी संजय दिना पाटील यांनी केली. संजय राऊत यांच्याबद्दल राग आहे का ? असे विचारले असताना संजय राऊत यांचा मला काही प्रॉब्लेम नाही. ठाकरे फॅमिलीशी कुणाशीच प्रॉब्लेम नाही. संजय राऊत यांना बोलण्याचा अधिकार आहे. मला त्यांनी २००४ मध्ये आमदार बनवण्यात मदत केली. नंतर किरिट सोमय्याच्या विरोधात लोकसभा लढताना मदत केली. मला एकाच व्यक्तीचा प्रॉब्लेम होता असेही त्यांनी सांगितले.

माझ्या घरात सर्वांना स्वत:चा निर्णय घ्यायचा अधिकार

राजुल पाटील या उबाटात राहाणार आहेत त्यासंदर्भात विचारले असता संजय दिना पाटील म्हणाले की माझ्या घरात सर्वांना स्वत:चा निर्णय घ्यायचा अधिकार आहे. त्यांना त्यांच्या धंदा काय करायचा ते त्यांनी ठरवायचे आहे. कुठल्या पक्षात काय काम करायचे आहे हे त्यांनी ठरवयाचे आहे. माझा पुतण्या बीजेपीचा कार्यकर्ता आहे. माझी सुनबाई बीजेपीची नगरसेविका आहे.एकाच घरात राहातो एकाच किचनमध्ये जेवतो. माझ्या मुलीने जर ठरले की मला तिथे रहायचे आहे. त्यात प्रॉब्लेम काय, सर्वांना आपले आपले आहे असेही संजय दिना पाटील यावेळी म्हणाले.

व्हिडीओ येथे पाहा –

Follow Us
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!