AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवतीर्थावरील शपथग्रहणाला चोरांचं ग्रहण, पावणेचार लाखांचा मुद्देमाल लंपास

मोठा पोलीस बंदोबस्त असतानाही शपथग्रहणाला थेट चोरांचंच ग्रहण लागल्याचं समोर आलं आहे (Thieves in Swearing in ceremony of Uddhav Thackeray).

शिवतीर्थावरील शपथग्रहणाला चोरांचं ग्रहण, पावणेचार लाखांचा मुद्देमाल लंपास
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Nov 29, 2019 | 8:26 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (28 नोव्हेंबर) मोठ्या दिमाखात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी महाविकासआघाडीच्या इतर 6 नेत्यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. मात्र, असं असतानाही या शपथग्रहणाला थेट चोरांचंच ग्रहण लागल्याचं समोर आलं आहे (Thieves in Swearing in ceremony of Uddhav Thackeray). चोरांनी या कार्यक्रमात आपला हात साफ करत तब्बल पावणेचार लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला (Thieves in Swearing in ceremony of Uddhav Thackeray).

मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या या शपथविधी सोहळ्यासाठी राज्यभरातून अनेक लोक आले होते. त्यामुळे शिवाजी पार्क येथील मैदानावर मोठी गर्दी झाली. याच गर्दीचा फायदा घेत चोरांनी रोख रक्कम, सोन्याची चेन आणि पाकिट अशा अनेक गोष्टी चोरल्या. चोरट्यांनी एका शिवसैनिकाची 3 तोळ्याची सोन्याची चेनही चोरली.

कार्यक्रम सुरु झाल्यानंतर चोरांनी शपथविधी कार्यक्रमात शिरकाव करुन एकूण 3 लाक 78 हजार 300 रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. अनेकांना आपले खिसे कापले गेल्याचं समजताच त्यांनी पोलीस स्टेशन गाठले. या प्रकरणी जवळपास 14 तक्रारदारांनी शिवाजी पार्क पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिसांनी याच तपास सुरु केला आहे.

विशेष म्हणजे शपथ ग्रहण सोहळ्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. अनेक ठिकाणी सीसीटीव्हीची देखील करडी नजर होती. तरीही चोरांनी पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेचा फज्जा उडवल्याने अनेक नागरिकांना याच फटका बसला.

Follow Us
प्रचंड लक्ष्मी दर्शन झालं, पण विजय सरस्वतीचाच; सतेज पाटलांचा....
Satej Patil : प्रचंड लक्ष्मी दर्शन झालं, पण विजय सरस्वतीचाच; सतेज पाटलांचा विरोधकांना टोला
झाडं तोडणारे कसाबचे बाप; वृक्षतोडीवरून संजय राऊत आक्रमक
Sanjay Raut : झाडं तोडणारे कसाबचे बाप; वृक्षतोडीवरून संजय राऊत आक्रमक
छत्रपती शिवरायांच्या सह्याद्रीच्या रांगा नष्ट करतायत! संजय राऊतांचा...
Sanjay Raut : छत्रपती शिवरायांच्या सह्याद्रीच्या रांगा नष्ट करतायत! संजय राऊतांचा सरकारवर घणाघात
आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही...; मतपेटीत सापडली चिठ्ठी; नेमकं काय...
MLC Election 2026 Maharashtra : आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही...; मतपेटीत सापडली चिठ्ठी; नेमकं काय लिहिलंय?
25-25 मतांचे गठ्ठे, पसंतीक्रमाची मोजणी; विधानपरिषद निवडणुकीचा निकाल...
Maharashtra MLC Election 2026 Result : 25-25 मतांचे गठ्ठे, पसंतीक्रमाची मोजणी; विधानपरिषद निवडणुकीचा निकाल नेमका कधी लागणार?
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत गोंधळ; तब्बल ६ ते ८ मतपेट्यांवर....
Pune MLC Election 2026 : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत गोंधळ; तब्बल ६ ते ८ मतपेट्यांवर....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; राजेंद्र शिंदेंनंतर आता...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; राजेंद्र शिंदेंनंतर आता...
70 टेबलांवर 13 फेऱ्यांमध्ये होणार प्राथमिक मतमोजणी
Maharashtra MLC Result 2026 Complete Overview : 70 टेबलांवर 13 फेऱ्यांमध्ये होणार प्राथमिक मतमोजणी
टायगर श्रॉफ प्रकरणी आरोपींच्या मोबाईलमधून महत्त्वाचे धागेदोरे समोर
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणी आरोपींच्या मोबाईलमधून महत्त्वाचे धागेदोरे समोर
10 तासांच्या खोळंब्यानंतर मध्य रेल्वेची लोकल सेवा सुरळीत!
Mumbai Local Update : Central Line : 10 तासांच्या खोळंब्यानंतर मध्य रेल्वेची लोकल सेवा सुरळीत; मुंबईकरांना मोठा दिलासा