TRP Scam | टीआरपी घोटाळ्यातील मास्टरमाईंड पार्थोदास गुप्ताला जामीन मंजूर

| Updated on: Mar 02, 2021 | 4:16 PM

दरम्यान टीआरपी घोटाळ्यात आतापर्यंत 15 जणांना अटक केली आहे.  (TRP Scam Bail granted to Partho Dasgupta)

TRP Scam | टीआरपी घोटाळ्यातील मास्टरमाईंड पार्थोदास गुप्ताला जामीन मंजूर
Follow us on

मुंबई : टीव्ही चॅनल्सकडून आपल्या चॅनलचा टीआरपी (TRP) वाढवण्यासाठी होत असलेल्या घोटाळ्याचा मुंबई पोलिसांनी मध्यंतरी भांडाफोड केला. या टीआरपी घोटाळ्यातील मुख्य आरोपी पार्थोदास गुप्ता याला आज अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई हायकोर्टाने पार्थोदास गुप्ता याचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याची सुटका करण्यात आली आहे. पार्थोदास गुप्ता हा गेल्या 66 दिवसांपासून जेलमध्ये होता. (TRP Scam Bail granted to Partho Dasgupta)

पार्थो दासगुप्ता टीआरपी घोटाळ्यातील मास्टरमाईंड

गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात टीआरपी घोटाळा उघडकीस आला. या गुन्ह्यात अनेक जण आरोपी आहेत. या गुन्ह्यात सुरुवातीला बार्कचे अधिकारी तक्रारदार होते. त्यानंतर त्यांचा सहभाग उघडकीस आल्यानंतर त्यांना ही अटक होऊ लागली. अशाच प्रकारे बार्कचे सर्वेसर्वा पार्थोदास गुप्ता याला 24 डिसेंबर 2020 रोजी अटक झाली होती. या गुन्ह्यात महत्त्वाचा रोल असल्याने त्याला अटक झाली होती.

पार्थो दासगुप्ता टीआरपी (टेलीविजन रेटिंग प्वाईंट्स) प्रकरणातील मास्टरमाईंड आहे. पार्थो दासगुप्ता 2013 ते 2019 या काळात BARC चा सीईओ होता. एका ठराविक चॅनेलच्या टीआरपी वाढवण्यासाठी पार्थोने त्या चॅनेलकडून वेगवेगळ्या प्रकारे फायदा उठवला होता. त्याच्याकडून पैसे ही घेतले होते. यामुळे पार्थोला अटक झाली होती.

15 जणांना अटक

पार्थो याने सुरुवातीला मुंबई सेशन कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र सेशन कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्याने मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर गेल्या शुक्रवारी सुनावणी पूर्ण झाली होती. या सुनावणीनंतर कोर्टाने आपला निकाल राखून ठेवला होता. याप्रकरणी आज कोर्टाच्या न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी हा निकाल दिला. यावेळी पार्थोचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान टीआरपी घोटाळ्यात आतापर्यंत 15 जणांना अटक केली आहे.  (TRP Scam Bail granted to Partho Dasgupta)

आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची नाव

1) विशाल वेद भंडारी
2) बोंम्पेल्लीराव नारायण मिस्त्री
3) शिरीष सतीश पट्टण शेट्टी
4) नारायण नंदकिशोर शर्मा
5) विनय राजेंद्र त्रिपाठी
6) उमेश चंद्रकांत मिश्रा
7) रामजी दुधनाथ शर्मा
8) दिनेश पन्नालाल विषवकर्मा
9) हरीश कमलाकर पाटील
10) अभिषेक कोलवडे
11) आशिष अबीदूर चौधरी
12) घनश्याम सिंग
13) विकास खांचंदाणी
14) रोमिल
15) पार्थो दासगुप्ता

या प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचने दोनदा आरोपपत्र दाखल केलं आहे. एकदा मूळ आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यानंतर पुरवणी आरोपपत्र दाखल केल आहे.

मुंबई पोलिसांनी रिपब्लिक चॅनेलचा टीआरपी घोटाळा उघडकीस आणला होता. बॅरोमिटरमध्ये फेरफार करून टीआरपी आकडे वाढवले जात होते.याबाबत मुंबई पोलिसांनी कारवाई करून जणांना अटक केली होती. या व्यक्तींच्या चौकशीत आरोपींनी रिपब्लिक चॅनेल पैसे देऊन लोकांना आपलं चॅनेल बघायला भाग पाडत असल्याचं उघडकीस आलं होतं.

काय आहे प्रकरण?

“रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी काही लोकांना पैसे देऊन आपल्या घरात दिवसभर हे चॅनेल सुरु ठेवण्यास सांगण्यात आले होते. यासाठी प्रत्येकी 400 ते 500 रुपये दिले जात असत. त्यामुळे चॅनेलच्या टीआरपीत मोठी वाढ दिसून आली होती. याचा थेट फायदा जाहिराती मिळवण्यासाठी होत असे. त्यामुळे आता या टीआरपीच्या आधारे संबंधित चॅनेल्सला मिळालेल्या जाहिरातींचीही चौकशी केली जाईल. तसेच हे जाहिरातदारही या रॅकेटमध्ये सहभागी होते का, याचा तपास केला जाईल” अशी माहिती परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

टीआरपी म्हणजे काय?

टीआरपीचा अर्थ टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट (Television Rating Point ) असा होतो. यावरुन प्रेक्षक कोणते टेलिव्हिजन चॅनेल जास्त पाहतात, हे ठरवले जाते. टेलिव्हिजन विश्वात कोणती मालिका किंवा वृत्तवाहिन्यांवरील कोणता शो सर्वात जास्त लोकप्रिय आहे, याचे मोजमापही टीआरपीच्या आधारेच केले जाते. सध्याच्या स्पर्धेच्या युगात जाहिराती मिळवण्यासाठी टीआरपी रेटिंग अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.  (TRP Scam Bail granted to Partho Dasgupta)

संबंधित बातम्या : 

TRP Scam : BARC चा माजी सीईओ पार्थो दासगुप्ताला अटक, 2016 पासून टीआरपी घोटाळा सुरु असल्याचा आरोप

TRP Scam | फेक ‘टीआरपी घोटाळ्याप्रकरणी अटक केलेले ‘ते’ 13 जण कोण?